• Tue. Apr 29th, 2025

हरियाणाचा पराभव जिव्हारी, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका, राहुल गांधींचा नेत्यांना सल्ला

Byjantaadmin

Oct 16, 2024

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. त्यामुळे सर्वच पक्ष अलर्ट झाले आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीपासून काँग्रेसला खूप अपेक्षा आहेत. पण, हरियाणामध्ये जो निकाल लागला त्याने काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला आहे. हरियाणामध्ये काँग्रेसला सत्ता त्यांच्याच हातात येणार असं वाटत होतं. पण, जो निकाल लागला त्याने काँग्रेसला मोठा झटका दिला. काँग्रेस अद्याप हरियाणाचा पराभव पचवू शकलेली नाही. हरियाणात काँग्रेसच्या पराभवाचं एक कारण ओव्हर कॉन्फिडन्स असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसला महाराष्ट्रात ते होऊ द्यायचं नाहीये.त्यामुळे सोमवारी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी नेत्यांना याबाबत अलर्ट केलं. तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्ट राहून चालणार नाही, असं त्यांनी नेत्यांना सांगितलं. तसेच, एकत्र राहून काम करण्याचा सल्लाही दिला.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत अभुतपूर्व विजय मिळवला. महाराष्ट्रातही काँग्रेस भाजपवर वरचढ ठरली. त्यामुळे हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसचा निकाल चांगला राहिल अशी अपेक्षा होती. पण, काँग्रेसला हरियाणात पराभवाचा सामना करावा लागला. जे अत्यंत आश्चर्यकारक होतं. येथे भाजपने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता भाजपला महाराष्ट्रातही जिंकणार असल्याचा आत्मविश्वास आहे. तर, काँग्रेसमध्ये जरा अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्यामुळे जे हरियाणात झालं ते महाराष्ट्रात होऊ नये यासाठी नेत्यांनी एकत्र येत काम करणं गरजेचं आहे. तसेच, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका, अशा सूचना राहुल गांधी यांनी केल्या आहेत.तसेच, महाराष्ट्रात जागावाटप ठरवणं हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. कारण, उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक जागा हव्या आहेत. पण, लोकसभेत काँग्रेसचं प्रदर्शन पाहता तेही सर्वाधिक जागांसाठी आग्रही आहेत. पण, तरीही कुठल्याही परिस्थितीत तिन्ही पक्ष एकत्रच निवडणूक लढतील यावर एकमत आहे.त्यातच आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने जागावाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली होती. त्याचा फायदाही त्यांना झाला. तोच पॅटर्न आताही राबवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. ठरलेल्या जागावाटपानुसार, काँग्रेस ११९ जागा लढवेल, ठाकरेंची शिवसेना ८६ तर शरद पवार गट ७५ जागा लढवेल. तसेच, लहान पक्षांना ७ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी शेकापला ३, समाजवादीला २ आणि माकपला २ जागा दिल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed