निलंगा ते दीक्षाभूमी नागपूर रॅली काढून सामाजिक बांधिलकी जोपासली..
निलंगा:-शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध,व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासत तो वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी निलंगा येथील मैत्री ग्रुपच्या वतीने निलंगा ते दीक्षाभूमी नागपूर धम्म रॅली काढून मैत्री ग्रुप ने एक आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला आहे.
हजारो वर्षापासून या देशातील दलीत समाजाला चिखलाच्या दलदलितून बाहेर काढण्यासाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला.व लाखो अनुयायांना धम्माच्या ओटीत टाकले.
अश्या या पवित्र दिनाचे औचित्य साधून अशोकनगर निलंगा येथील विचारांनी प्रेरित झालेल्या अमोल मैत्री ग्रुप चे कांबळे,बलवान सूर्यवंशी,अमोल सूर्यवंशी,विष्णू कांबळे,गिरीश पात्रे, पवन सूर्यवंशी यांनी समाजाचं काही देणं लागतो या उद्देशाने एकत्र येऊन जवळपास १२५ धम्म बंधू भगिनींना सोबत घेऊन निलंगा ते दिक्षाभूमी नागपूर धम्म रॅली काढून अंधश्रध्दा ,अंधविश्वास या रूढी परंपरेला फाटा देण्याचा प्रयत्न केला आहे.याबद्दल मैत्री ग्रुपचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
