• Tue. Apr 29th, 2025

महायुती सरकार बळीराजाच्या पाठीमागे खंबीर-आ.संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Oct 13, 2024

महायुती सरकार बळीराजाच्या पाठीमागे खंबीर-आ.संभाजी पाटील निलंगेकर

निलंगा:-राज्यातील महायुती सरकार हे शेतकरी शेतमजूर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून त्यांच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे.असे प्रतिपादन माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी साल्वंट सोयाबिन प्रकल्प युनिट २ उदघाटन प्रसंगी केले आहे…

यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर,नर्मदा साल्वंटचे चेअरमन डॉ.महेश क्षिरसागर,मंगेश पाटील,कुमोद लोभे,काशिनाथ गरीबे,सभापती शिवकुमार चिंचनसुरे,नरशिंग बिरादार,सदाशिव पाटील,दगडू सोळुंके,बाळासाहेब शिंगाडे मधुकर माकणीकर,बंडू नाईकवाडे,अंगद नाईकवाडे,माधवराव नाईकवाडे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले  महाराष्ट्रत नर्मदा ग्रूपचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.हा सोयाबिन प्रक्रिया प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती आणणारा प्रोजेक्ट आहे.सदरील प्रकल्पामुळे चाराशे पेक्षाजास्त लोकाना रोजगार मिळणार आहे.या युनिटमुळे शेतकऱ्यांच्या  जीवनात क्रांती येणार असून शेतकरी हितासाठी हा प्रकल्प आपण तालुक्यात आणला आहे.सोयाबिन उत्पन्नाबरोबर त्याला मोठा भाव मिळावा यासाठी ही कंपनी काम करणार असून एकरी सोयाबिन उत्पादन वाढीसाठी कंपनी वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे.तसेच याचा फायदा मोठ्या प्रमाणात सोयाबिन उत्पादन वाढीवर होणार आहे.शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती गढवणारा हा प्रकल्प असून आपल्या तालुक्यात सोयाबिनवर प्रक्रिया करून अनेक उत्पादने निर्माण करणारा ३० एकरातील आपल्या भागातील पहिला कारखाना उभा टाकत आहे.

सोयाबिन तफावत रक्कम,अतिवृष्टी,नुकसानभरपाई पिकविमा,असे मिळून या महायुती सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांना ४० हजार रूपये रक्कम शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत देणार  असून यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.गेल्या चौदा वर्षापासून बंद पडलेला अंबुलगा कारखाना चालू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यात सर्वात जास्त भाव आपण दिला आहे,कारखानदारीत स्पर्धा निर्माण करून १७ ते १८ महिणे उभा ऊस ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या कारखानदारीतील मक्तेदारी मोडीत काढत आपण १२ महिणे झाल्याबरोबर ऊस घेऊन जात आहोत.अंबुलगा कारखान्याची गाळप क्षमता आडीच हजारावरून आपण पाच हजारावर नेली असून वेळेत ऊस नेल्याने या भागातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला आहे.व त्याचे कोयुनिट चालू करून डिसलरी व सिएनजी निर्मीती आपण थोड्याच दिवसात सुरू करणार आहोत.असे आमदार निलंगेकर यानी यावेळी सांगितले.

मी या भागातील शेतकऱ्यासाठी गेल्या २५ वर्षापासून संघर्ष करत असून माझ्यासाठी आपण येत्या विधानसभेत फक्त तिस दिवस वेळ द्या तसेच विस वर्षात आपण जेवढा तालुक्याचा विकास केला आहे.तेवढाच विकास आपण येणाऱ्या पाच वर्षात करू आणि तालुक्याचा चेहरामोहरा बदलू असे भावनिक साद यावेळी उपस्थिताना आमदार निलंगेकर यानी घातली आहे.संभाजीरावांच्या विजयाचा गुलाल या कार्यक्रमापासूनच सुरवात होईल…माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर 

दस-याच्या शुभ मोहर्तावर हा कारखाना भूमिपुजन केला असून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होईल व शेतकरी वनवन भटकू नये म्हणून कारखाना नव्याने  चालू केला असून या भागातील शेतकरी सुखी समाधानी जीवन जगावे व त्यांचे मुलबाळ चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावे यासाठी हा सोयाबिन प्रक्रिया प्रकल्प आपल्या तालुक्यातील संभाजीरावानी आणला असून ख-या आर्थाने आजपासून सर्वानी कामाला लागावे व संभाजीरावाच्या विजयाचा गुलाल उधळावा असा शुभसंदेश माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिला.कार्यक्रमाचे प्रास्तविक कंपनीचे व्यवस्थापक हणमंत सौदागर यानी तर सुञसंचन महादेव मेहकरे यानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed