• Wed. Apr 30th, 2025

मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही, तसं केलं तर…

Byjantaadmin

Dec 16, 2022

मुंबईत (Mumbai) निघणारा मोर्चा हा महाराष्ट्रप्रेमींचा आहे. राज्यातील विरोधी पक्षांचा (Opposition Parties) हा मोर्चा नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार  संजय राऊतयांनी केलं. हे सरकार जर मोर्चाला परवानगी नाकारणार असेल तर सत्तेवर महाराष्ट्रद्रोही सरकार बसलंय असं म्हणाणं लागेल असेही ते म्हणाले. ते सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही. परवानगी नाकारली तर त्याचे फार मोठे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेत उमटतील असा इशारा दिला

उद्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह समविचारी पक्षांचा मुंबईत मोर्चा निघणार आहे. अद्याप या मोर्चाला सरकारकडून परवानगी मिळाली नाही. याबाबत संजय राऊत बोलत होते. मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही असे राऊत म्हणाले. खरतर सरकारमधील लोकांनी मोर्चात सामील होणं गरजेचं असल्याचे राऊत म्हणाले. एकीकडे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत. राज्यातील उद्योग बाहेर जातातेय. हा राज्यवार  खूप मोठा अन्याय असल्याचे संजय राऊत म्हणाले.

एकीकडे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत. राज्यातील उद्योग बाहेर जातातेय. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय असल्याचे संजय राऊत म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात महाराष्ट्र प्रेमींचे मोर्चे निघाले होते. तशाप्रकारचा मोर्चा उद्या निघणार आहे. घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात सत्तेवर बसलं आहे. आम्ही कोणतंही काम घटनाबाह्य करत नाही. हे सरकार लोकशाही पद्धतीला विरोध करत असल्याचे राऊत म्हणाले.  आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहोत. त्याच मार्गाने आम्ही तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचू असेही राऊत यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *