विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा परीक्षांचा पर्याय निवडावा- कुलदीप कोटंबे
निलंगा- येथिल महाराष्ट्र महाविद्यालयातील करीअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षाच्या वतीने युपीएससी जागरूकता कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॅा. माधव कोलपूके हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एक्सलन्स करीअर अकॅडमी, पुणे चे संचालक कुलदीप कोटंबे हे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोटंबे यांनी युपीएससी परीक्षेचे स्वरूप व त्याची तयारी करण्याच्या पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा पर्याय शालेय जीवनापासूनच निवडावा असे प्रतिपादन केले. विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थीदशेत आत्मसात करून यश मिळवता येते असे मत डॅा. कोलपूके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॅा. ज्ञानेश्वर चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा. नरेश पिनमकर यांनी केले तर आभार डॅा. गोविंद शिवशेट्टे यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा. वैभव सुर्यवंशी व कु. धनश्री हिरास यांनी केले. महाविद्यालयातील सुमारे १३० विद्यार्थी या कार्यशाळेला उपस्थित होते.
