राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य, सीमाप्रश्नी महाराष्ट्राची गळचेपी, सत्ताधाऱ्यांची महापुरुषांबत वादग्रस्त वक्तव्ये याच्या निषेधार्थ शनिवारी (१७ डिसेंबर) मुंबईत विरोधी पक्ष ‘संयुक्त महामोर्चा’ काढणार आहेत. मुंबईत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे गुरुवारी विराेधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सरकारने परवानगी नाही दिली मोर्चा काढूच, असा निर्धार विरोधकांनी केला.
आज साेलापूर शहर बंद
साेलापूर | महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्यांच्या निषेधासाठी विविध पक्ष आणि संघटनांनी शुक्रवारी साेलापूर शहर बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी तगड्या बंदाेबस्ताचे नियाेजन केले आहे.