• Mon. Apr 28th, 2025

भाजपच्या खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश

Byjantaadmin

Apr 3, 2024

उन्मेष पाटील यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आपल्या कामाची दखल भाजपने घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.”एका भावाने दगा दिला, पण दुसरा भाऊ माझ्यासोबत आहे,” अशा भावना उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर व्यक्त केल्या. मी सकारात्मक राजकारण केले. बदल्याच्या राजकारणामुळे मनाला वेदना होतात, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केल

भारतीय जनता पक्षात बदला घेण्याची राजनिती अत्यंत वेदनादायी आहे, सतत करण्यात आलेली अहवेलना ही स्वाभिमान दुखावणारी आहे,. त्यामुळे स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपण भारतीय जनता पक्ष सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, असे उन्मेष पाटील यांनी सांगितले. मातोश्रीवर आज त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत पारोळा येथील भाजपचे युवा नेते करण पवार यांनीही शिवबंधन बांधले.जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. त्यांच्यासह पारोळा येथील भाजपचे युवा नेते व माजी नगराध्यक्ष करण पवार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले, यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेा ठाकरे गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

UDHAV THAKRE म्हणाले. “वापरा आणि फेकून द्या ही भाजपची भूमिका आहे, त्यामुळे तुम्ही काम करूनही तुमची किंमत त्यांनी केलेली नाही, मात्र आज तुम्ही जनमताच्या प्रवाहात आला आहात. जळगावात आमच्यासोबतही गद्दारी झाली आहे. तुमच्या प्रवेशामुळे आता जळगाव लोकसभेत शिवसेनेचा अस्सल भगवा विजयी होईल,”खासदार उन्मेष पाटील, “भारतीय जनता पक्षाने आपल्या कामाची किंमत केली नाही, नेहमीच आपला स्वाभिमान दुखावला आहे.बदला घेण्याच्या भावनेनेच त्यांनी माझ्याशी वर्तणूक केली आहे. आमदार म्हणून मी चांगले कार्य केले होते, मला खासदारकीची उमेदवारी नको होती,त्यावेळी बदला घेण्याच्या भावनेने मला उमेदवारी दिली. तरीही मी विकासात्मक बदलाच्या दृष्टीने उमेदवारी स्विकारून मोठ्या मताधिक्याने विजयी झालो. त्यानंतर जळगाव लोकसभा मतदार संघात विकासाचे काम केले,””गिरणा नदीच्या विकासासाठी परिक्रमा केली. परंतु विकासाचे राजकारण भाजपच्या नेत्यांना मान्य झाले नाही. त्यांनी माझे कौतुक केले नाही, उलट माझी अहवेलना केली, भाजपचा बदला घेण्याच्या राजकारणामुळे आपला स्वाभिमान दुखावला. स्वाभिमानाने राजकारण करण्यासाठी तसेच जनतेचा विकास करण्यासाठी आपण स्वाभिमानाने कार्य करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असून आपण शिवसेनेची मशाल आपण कार्याच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात तेवत ठेवणार आहोत,” असे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed