• Mon. Apr 28th, 2025

मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Byjantaadmin

Apr 3, 2024

मुंबई : शिवसेना ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे.  कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली. महत्त्वाचं म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.  याआधी ठाकरे गटाने 17 जणांची उमेदवार यादी जाहीर केली होती.   उत्तर मुंबई आम्ही मित्र पक्षाला विचारतोय आमच्याकडे उमेदवार आहेत पण मित्र पक्षाला विचारतोय, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. 

ठाकरेंची दुसरी उमेदवार यादी

  • कल्याण लोकसभा – वैशाली दरेकर 
  • हातकणंगले – सत्यजीत पाटील
  • पालघर – भारती कामडी
  • जळगाव – करण पवार 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणी फिसकटली नाही. हातकणंगले आणि सांगली आम्ही लढात आहोत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिकडचे राजकीय गणित पाहता आम्हाला कार्याकर्त्यांनी विनंती केली की आमचा उमेदवार द्यावा.  राजू शेट्टी यांना म्हटलं आम्ही पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

प्रकाश आंबेडकरांबाबत बोलणार नाही

प्रकाश आंबेडकर यांनी NAGPUR मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला. मी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आमचे जुने ऋणानुबंध आहेत. यावेळेस जमलं नाही. पण ते हुकूमशाहीविरोधात एकत्र येतील असं वाटलं होतं. मी पूर्ण प्रयत्न केला, संविधान वाचविण्यासाठी एकत्र यावं. मी कार्याकर्त्यांना सांगितलं त्यांनी कितीही आरोप केला तरीही बोलू नका, अशा सूचना केल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

भाजपचा विद्यमान खासदार ठाकरे गटात

दरम्यान, भाजपचेJALGAON चे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले आहेत. आजच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उन्मेश पाटील यांचं तिकीट भाजपने कापलं आहे. त्यामुळे उन्मेश पाटील यांनी थेट भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश केला.  त्यांना जळगावातून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ठाकरेंनी करण पवार यांना जळगावातून मैदानात उतरवलं आहे.

ठाकरे गटाची पहिली यादी

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनंत गिते, अनिल देसाई, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल किर्तीकर यांची नावं होती.  

ठाकरे गटाची उमेदवार यादी  

BULDHANA- नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे-पाटील

SANGLI -चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक – राजाभाई वाजे
RAIGAD अनंत गीते
SINDHDURG विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी – संजय जाधव
MUMBAI दक्षिण मध्य – अनिल देसाई 

कल्याण लोकसभा – वैशाली दरेकर 

हातकणंगले – सत्यजीत पाटील

पालघर – भारती कामडी

जळगाव – करण पवार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed