कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष पेटला आहे. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर काँग्रेस हायकमांडला डी. के. शिवकुमार यांचे मन वळवण्यात यश आले आणि सिद्धरामय्या यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळाले. आताही डी. के. शिवकुमार यांचे समर्थक अधूनमधून अनेकदा त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवतात. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आता यांच्या ताज्या वक्तव्यामुळे डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांना आनंद होऊ शकतो. काँग्रेसचे शीर्षस्थ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जवळचे डी. के. शिवकुमार हे अजूनही कर्नाटकच्या राजकारणात त्यांचे अढळस्थान टिकवून आहेत.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. म्हैसूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भविष्यात कोणतीही निवडणूक लढवायची इच्छा नाही, असे म्हटले आहे. सिद्धरामय्या यांचे वय वाढत आहे आणि त्यांना काही अंशी आरोग्याच्या समस्या आहेत. विधानसभा निवडणुकीत वरुणा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी निवृत्तीबाबत संकेत दिले. 77 वर्षीय सिद्धरामय्या यांनी सांगितले की, माझे वय वाढत आहे. आज असलेल्या ऊर्जेने भविष्यातही मी किती दिवस काम करू शकेन? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.सिद्धरामय्या म्हणाले, ‘मी 77 वर्षांचा आहे. माझा मुख्यमंत्री आणि आमदार म्हणून अजून चार वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. माझा कार्यकाळ संपेल तोपर्यंत मी 81-82 वर्षांचा असेल. अशा स्थितीत मी त्या वयात आज असलेल्या ऊर्जेने काम कसे करू शकणार? मी 1978 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता आणि निवृत्तीपर्यंत मी 50 वर्षे पूर्ण केली असतीनेतृत्वात बदल होण्याची शक्यता कर्नाटकात काही काळापासून सातत्याने वर्तवली जात होती. आपल्या वरुणा या विधानसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन करताना सिद्धरामय्या म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला येथून 60 हजार मतांची आघाडी मिळाली पाहिजे.”डी. के. शिवकुमार हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सध्या उपमुख्यमंत्रीही आहेत. ते मुख्यमंत्री होऊ न शकल्याने काँग्रेस नेतृत्वाने त्यांना दोन महत्त्वाची पदे दिली असल्याचे बोलले जात होते. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा कधीच लपवून ठेवली नाही. ते वोक्कलिंगा समुदायातून येतात.
