• Mon. Apr 28th, 2025

ससून रुग्णालयाच्या ICU मध्ये उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू

Byjantaadmin

Apr 2, 2024

पुण्यातील ससून रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ससून रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.  सागर रेणूसे असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या प्रकारामुळे ससून रुग्णालयाच नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सागर रेणूसे नावाचा तरुण पुण्यातील भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्यानंतर त्याला 16 मार्चला त्याला ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं आणि आय सी यु मध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले.  मात्र 26 मार्चला त्याची प्रकृती खालावत होती. त्यानंतर नेमकं काय झालं याचा शोध घेतला असता. उंदीर चावल्याचं समोर आलं. हा प्रकार पाहून नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. आय सी यु मध्ये त्याच्या डोक्याला,  कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला.  त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन आज सकाळी त्याचं निधन झालं. 

अखेर डॉक्टरांनी मान्य केलं!

त्याचं निधन झाल्यावर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही वेळ डॉक्टरांनी नकार दिला. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याच मान्य केलं आहे

नातेवाईक आक्रमक!


हा सगळा प्रकार माहित होताच ससून रुग्णालयात अनेक नातेवाईक जमले होते. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांवर उंदीर चावल्याचे आरोप केले. मात्र बराच वेळ डॉक्टरांनी हा आरोप मान्य केला नाही. ज्यावेळी नातेवाईकांनी गोंधळ घातला त्यावेळी त्यांनी उंदीर चावल्याचं मान्य केलं. हा प्रकार पाहून नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते. 

तरुण मुलगा गेल्यानं रेणुसे परिवारावर शोककळा

सागर रेणूसेचा फक्त अपघात झाला होता. योग्य उपचार होऊन सागर बरा होईल, अशी नातेवाईकांना अपेक्षा होती. काही प्रमाणात गंभीर मार लागल्याने त्याला ससूनमधील आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. मात्र ससून रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि भोंगळ कारभारामुळे सागरचा जीव गेला. 30 वर्षाचा असलेला सागर अचानक गेल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे. या प्रकरणी नातेवाईक आता कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed