• Tue. Apr 29th, 2025

लातूर शहरात काल कचरा जाळण्याची मोहीम होती का?

Byjantaadmin

Apr 2, 2024

लातूर शहरात काल कचरा जाळण्याची मोहीम होती का?

नवीन रेणापूर नाका विष्णुदास मंगल कार्यालय जवळ कचरा पेटवून देण्यात आला होता.डी मार्ट रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी कचरा साठलेला होता त्या प्रत्येक ठिकाणचा कचरा मुद्दामून पेटवून देण्यात आला होता. याच पद्धतीने जिल्हा परिषद समोर जुन्या रेल्वे लाईनच्या भागात ठीक ठिकाणी कचरा पेटवून देण्यात आला होता. यासोबतच बार्शी रोडवर निवासी महिला तंत्रनिकेतन निकेतनच्या बाजूला साठलेला कचरा पेटवून देण्यात आला होता. या सोबतच खाडगाव स्मशानभूमीच्या शेजारी साठलेल्या कचरा पेटवून देण्यात आला होता. जिल्हा क्रिडा संकुल समोर कचरा पेटवून देण्यात आला. जून्या रेल्वस्थानक जवळ महात्मा गांधी चौक येथे कचरा पेटवून देण्यात आला.काही ठिकाणी सफाई कामगाराद्वारे कचरा पेटवण्यात आला होता.काल रात्री एक-दोन ठिकाणी अग्निशमन कानाच्या जवानांनी पेट्रोलला कचरा विझवला.स्थानिक नागरिकांनी याबाबत निवेदन नेउनही पालिका प्रशासन उदासीन आहे. अन्यथा पर्यावरण आणि आरोग्य अशा दोन्ही पातळीवर शहराला गंभीर परिणामांचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसात कचरा ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पेटवून दिल्यामुळे हवेची गुणवत्ता ५५ ते ६५ या मापकात असताना मागील चार-पाच दिवसात ही हवेची गुणवत्ता १२०-१३० या मापकापर्यंत धोकादायक पातळीजवळ जाऊन पोहोचलेली आहे.कचरा जाळल्याने अनेक विषारी वायू, धूर वातावरणात पसरत आहेत. यापासून कर्करोग, यकृताचे आजार, मलावरोध, अस्थमा, श्वसनावरोध, मेंदूविकार होण्याची दाट शक्यता आहे. फोम कप्स, अंडय़ाचे ट्रे, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक साहित्य जाळल्याने निघणारा स्टायरिन वायू त्वचा आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम करणारा ठरत आहे. कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे संवेदनशील श्वसन यंत्रणेवर विशेषत: लहान मुलांच्या श्वसनावर विपरीत परिणाम होतो. त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे याचा त्रास होतो. होणाऱ्या प्रदूषणामुळे गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांचे आरोग्य खालावू शकते.अनेक ठिकाणी सफाई कर्मचारीच कचरा पेटवून देताना दिसतात. त्यामुळे सकाळी या भागात सर्वत्र धूर पसरलेला असतो. कित्येकदा झाडाखाली कचरा पेटवण्यात आलेला असतो त्याची झळ परिसरातील झाडांना बसते. रस्त्याने जाणारे नागरिक आणि रहिवाशी यांनाही या धुराचा त्रास सहन करावा लागतो.महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधितांना सूचना देण्याची आणि कारवाई करण्याची गरज आहे.काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने शहरातील झोन प्रमाणे संपर्क नंबर जाहीर केले होते परंतु असे अनेक संपर्क नंबर जाहीर न करता एकच मध्यवर्ती नंबर जाहीर केला तर सगळ्यांना नागरिकांना  फोन करण्यास सोपे जाईल. वेगवेगळे नंबर जाहीर केल्याने हद्दीचा भाग आणि झोन माहीत नसणे अशा घटना अशी अडचणी निर्माण होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed