ऐन लोकसभा निवडणुकीत प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला (Congress News) तब्बल 3 हजार 567 कोटींच्या करवसुलीची नोटीस पाठवली आहे. बँक खाती यापूर्वीच गोठवण्यात आल्याने पक्षाची आर्थिक कोंडी झाली आहे. विभागाच्या या कारवाईविरोधात पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टात काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.प्राप्तिकर विभागाने काल काँग्रेसला 2014 ते 2017 या कालावधीसाठी 1745 कोटी रुपयांच्या कराची मागणी केली आहे. यापूर्वीच पाठवलेल्या दोन नोटिशींवरून आधीच संतापलेल्या काँग्रेसला तिसऱ्या नोटिशीमुळे मोठा धक्का बसला. कारण काँग्रेसकडील थकीत कराची रक्कम 3567 कोटींवर पोहाेचली आहे.
काँग्रेसच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. लोकसभा निवडणूक पार पडेपर्यंत करवसुली करणार नसल्याचे स्पष्टीकरण कर विभागाकडून देण्यात आले. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी थेट 24 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. काँग्रेसला हा मोठा दिलासा मिळाला आहे.काँग्रेसच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. लोकसभा निवडणूक पार पडेपर्यंत करवसुली करणार नसल्याचे स्पष्टीकरण कर विभागाकडून देण्यात आले. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी थेट 24 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. काँग्रेसला हा मोठा दिलासा मिळाला आहे.कोर्टासमोर पक्षाची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, केंद्राने पक्षाच्या मालमत्ता जप्त करून 135 कोटी रुपये वसूल केले आहेत. आम्ही एक राजकीय पक्ष आहोत, नफा कमावणारी संस्था नाही.

दरम्यान, प्राप्तिकर विभागाने काल पाठवलेल्या नोटिशीतून 2014-15 साठी 663, 2015-16 साठी 664 आणि 2016-17 साठी 417 कोटींच्या कराची मागणी या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. काँग्रेसला तीन दिवसांपूर्वी दुसरी नोटीस आली होती. त्यातून 1823 कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली आहे. हा कर 2017-18 ते 2020-21 या वर्षातील आहे. कराच्या रकमेवर दंड आणि व्याजही लावण्यात आले आहे.
प्राप्तिकर विभागाने काँग्रेसची बँक खातीही गोठवली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी पैसे नसल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांकडूनही या मुद्द्यांवरून भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. काँग्रेसकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे नसल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे.