लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रचार यंत्रणा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गतीमान करावी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
प्रतिनिधी :लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रचार यंत्रणा पदाधिकरी, कार्यकर्ते यांनी गतीमान करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. २९ मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १,२,३,४ मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, सचिव गोरोबा लोखंडे विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, माजी नगरसेवक सचिन बंडापल्ले, अहमदखा पठाण, विजयकुमार साबदे, इमरान सय्यद, प्रा प्रवीण कांबळे, आसिफ बागवान, काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक एकचे अध्यक्ष दगडूआप्पा मिटकरी, प्रभाग दोनचे अध्यक्ष निजाम शेख, प्रभाग तीनचे अध्यक्ष विकास कांबळे, प्रभाग चार चे अध्यक्ष आसिफ बागवान, वर्षा मस्के, विष्णुदास धायगुडे आदींसह लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १,२,३,४ मधील सर्व बुथ प्रमुख काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका 2025 मध्ये होतील, लातूर लोकसभेची निवडणूक आपणाला जिंकायची आहे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये सकारात्मक स्पर्धा करावी, काँग्रेस पक्षाच्या कामात अग्रेसर राहावे, लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. लातूर शहराच्या पूर्व भागात मागासवर्गीय समाज जास्त आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या बाहेर जाऊन आपण काही केले नाही संविधानाला मानणारा काँग्रेस पक्ष आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की शेतकऱ्यांवरील अन्याय महागाई, बेकारी यांच्या विरोधात ही लढाई आहे. पेट्रोल डिझेल दरवाढच्या माध्यमातून नागरिकांची लूट केली जात आहे, विद्यमान खासदार आपल्या कामाला आले नाहीत, ते भेटले नाहीत, म्हणून आपल्या हक्काचा काँग्रेसचा खासदार निवडून आणायचा आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे म्हणाले की, यांनी एकमेकांमध्ये सकारात्मक स्पर्धा करावी बेरोजगारी, शेतीमालाला हमीभाव, महागाई या विषयावर मतदारांशी संवाद साधावा असे सांगून त्यांनी पक्ष आणि उमेदवारांच्या विजयासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या बैठकीचे प्रास्ताविक माजी नगरसेवक सचिन बंडापल्ले यांनी केले तर बुथप्रमुखांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे शेवटी आभार माजी नगरसेवक इम्रान सय्यद यांनी मानले.
