• Mon. Apr 28th, 2025

जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या 274 कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

Byjantaadmin

Mar 31, 2024

जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या 274 कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

•       जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश

•       274 योजनांच्या कामातील दिरंगाईमुळे कारवाई

लातूर, दि. 31 : जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिले आहेत. त्यानुसार एकूण 274 कामांच्या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाणार आहे.

ग्रामीण भागात प्रत्येक घराला पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेली काम विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. तरीही काही कंत्राटदारांकडून या योजनेच्या कामांमध्ये दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर यांनी कठोर भूमिका घेत संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या जवळपास 274 योजनांची कामे ठरवून दिलेल्या टप्प्यामध्ये होत नसल्याने ही कामे विहित मुदतीत पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed