• Mon. Apr 28th, 2025

‘वंचित’च्या दुसऱ्या यादीत लातूरच्या उमेदवारांचा समावेश!

Byjantaadmin

Mar 31, 2024

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने रविवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमधून 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली आहे. महाविकास आघाडीत समावेश गणित फिस्कटल्यानंतर आता ‘वंचित’ने राज्यभरातील लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर करणे सुरू केले आहे.

‘वंचित’च्या दुसऱ्या यादीत ‘या’ उमेदवारांचा समावेश –

हिंगोली : बी. डी. चव्हाण, लातूर: नरसिंगराव उदगीरकर, सोलापूर: राहुल गायकवाड, माढा: रमेश बारस्कर, सातारा: मारुती जानकर, धुळे :अब्दुल रहमान, हातकणंगले : दादासाहेब पाटील, रावेर: संजय ब्राह्मणे, जालना: प्रभाकर वाकडे, मुंबई उत्तरमध्य : अमोल हसन खान, रत्नागिरी सिंधुदुर्ग: काका जोशी

दरम्यान ‘वंचित’ काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ‘वंचित’ने कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. ‘वंचित’ नांदेडच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.नांदेडच्या काँग्रेस उमेदवाराला ‘वंचित’ पाठिंबा देईल की नाही या विषयी आंबेडकर म्हणाले, काँग्रेस मधील वरिष्ठ या विषयी काही मागणी करत नाही तोपर्यंत नांदेडच्या उमेदवाराला वंचितचा पाठिंबा राहणार नाही, त्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेते याकडे नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.नितीन गडकरी हे नागपुर येथुन पडणार आहे. याचे दुःख काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन दिसुन येत आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे भाजप चे हस्तक असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नांदेडमध्ये ‘वंचित’ उमेदवार?

नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची चांगली स्थिती असून नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेला राजकीय बदल लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी इतर कुठल्याही पक्षापेक्षा सरस आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार द्यावा असा ठराव पूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीकडे पाठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed