• Tue. Apr 29th, 2025

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ‘हे’ आहेत संभाव्य उमेदवार

Byjantaadmin

Mar 30, 2024

ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपकडून लोकसभेच्या उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. आता शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी चार वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उमेदवारांची यादी मुंबईतील पक्ष कार्यालयात जाहीर करणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार देखील समोर आले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, माढामधून धैर्यशील मोहिते-पाटील, अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरीतून भास्कर भगरे, वर्धामधून अमर काळे, बीड येथून बजरंग सोनवणे, रावेर येथून रवींद्र भैय्या पाटील, भिवंडी येथून बाळ्या मामा म्हात्रे हे उमेदवार लोकसभा निवडणूक लढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed