लातूर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे, कार्याध्यक्ष गणेश मडावी, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष सुमित भुईगळ यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे यांनी औसा पंचायत समितीतील कर्मचारी ओंकार शेषेराव वंजारे यांची लातूर जिल्हा परिषद विंगच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली. निवडीनंतर सरचिटणीस अशोक माळगे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन सन्मान केला.

निवडीबद्दल माहिती व जनसंपर्क विभागाचे सहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके, लातूर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, कार्याध्यक्ष गणेश राठोड, कोषाध्यक्ष प्रशांत म्हेत्रे, जिल्हा संघटक नागरत्न कांबळे, जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी रामकिशन फड, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष मस्के, जिल्हा परिषदेचे सुधीर बोकेफोडे, पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष नीलराज बनसोडे, शाखा अभियंता नामदेव घोडके, विवेक डावरे, दिलीप वाठोरे, रामकिशन तोकले, अहमद बेग, प्रसिध्दीप्रमुख बालाजी केंद्रे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी श्री. वंजारे यांचे अभिनंदन केले.