माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिलाताई पाटील यांचे केले अभिनंदन
लातूर प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २८ मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिलाताई पाटील यांचे अभिनंदन करून कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ अरविंद भातंबरे, जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष पाटील बालिका मुळे आदी
उपस्थित होते.
