• Fri. May 16th, 2025

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांची हरंगूळ (बु) येथे सुसंवाद बैठक

Byjantaadmin

Mar 28, 2024

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांची हरंगूळ (बु) येथे सुसंवाद बैठक

लातुर प्रतिनिधी : लातुर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हरंगूळ  (बु) येथे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत लातुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची सुसंवाद बैठक सूर्यकांत पाटील यांच्या निवासस्थानी बुधवार दि.२४ मार्च रोजी संपन्न झाली. प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि डॉ. शिवाजी काळगे यांनी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणी मुर्तीचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले. याबैठकीसाठी हरंगूळ (बु)सह श्याम नगर, खाडगाव, वरवंटी, बसवंतपूर
येथील ग्रामस्थ, विविध संस्था पदाधिकारी,पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आणि आपण निवडणुकीत मतांचे दान आपण मतदार करतो. आज भारत सरकारची धोरण काय आहेत हे आपण पाहतोय आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही.आशा परिस्थितीत आपल्या परिसरात असलेल्या मांजरा परिवारातील साखर कारखान्या मुळे आपली रिस्थिती बरी आहे.आज युवक उच्च शिक्षण घेऊन नौकरी साठी फिरत आहेत आणि नौकरी दुर नौकार्या करिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षाचे पेपर फोडले जात आहेत. आजची राज्यातील राजकीय परिस्थिती आपन पाहत आहात पक्ष नेमका कुणाचा हे माहिती असताना आपण काही करू शकत नाही पण आता लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने आपण मतदार लोकन्यायालयाच्या भूमिकेत आहोत तेव्हा आपल्याला न्याय करण्याची संधी या निवडणुक निमित्ताने आपल्याला मिळाली आहे आणि देशातील संपूर्ण चित्र आपल्याला बदलायचे असेल तर महाविकास आघाडी च्या उमेदवाराना आपल्याला भरघोस मतानी निवडून द्यावे लागेल असे सांगीतले.


हरंगूळ (बु) येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी दिल्या पण त्याला आयकर कक्षेतुन बाहेर काढून जमीन देणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देत डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागावे आणि डॉ. शिवाजी काळगे यांना बाभळगाव पेक्षा अधिक लीड हरंगूळने द्यावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी हरंगूळ (बु) सह परिसरातील उपस्थित सर्वांना केले.
यावेळी बोलताना डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, आपल्या सर्वांच्या इच्छेखातर मला उमेदवारी मिळाली ती माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मुळेच मिळाली. रुग्ण सेवा देताना माझा सतत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांशी गेली २५ वर्ष संपर्क आहे आणि या सेवेतून मला सर्व सामान्य माणसाच्या अडीअडचणी, समस्या, विविध प्रश्न  समजत गेले. या सोबतच तरुणांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, शेतकरी बांधवांचे शेतीमाल भावाचे प्रश्न गेली कांही वर्षे कमी न
होता वाढत आहेत आणि या प्रश्नावर आज केंद्रात कोणीही बोलायला तयार नाही.आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर या निवडणुकीत आपल्याला केवळ सरकारच्या जाहिरातबाजीला बळी न पडता बदल करावा लागेल त्यासाठि आपण आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावून येत्या लोकसभेत महाविकास आघाडी काँग्रेस ला मताधिक्य द्यावे अशी विनंती केली.यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ऍड.किरण जाधव,तालुकाध्यक्षसुभाश घोडके, सर्जेराव मोरे,सुनील पडिले,श्री झुंजारे, सूर्यकांत पाटील, सुडेअण्णा,परमेश्वर श्याम बरुरे, वाघमारे,ऍड.चंद्रकांत पाटील, अनुप शेळके यांच्यासह युवक, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *