• Tue. Apr 29th, 2025

डॉ. आंबेडकर पार्कच्या सुशोभीकरणाचे  काम त्वरित सुरु करावे :  प्रा. प्रवीण कांबळे 

Byjantaadmin

Sep 28, 2022

डॉ. आंबेडकर पार्कच्या सुशोभीकरणाचे  काम त्वरित सुरु करावे :  प्रा. प्रवीण कांबळे

लातूर : लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या सुशोभीकरणाच्या कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही. हे काम त्वरित सुरु करण्यात यावे,अशी मागणी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांनी केली आहे.
याबाबत मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात प्रा. प्रवीण कांबळे यांनी पुढे असे नमूद केले आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांनी दोन कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती व वर्क ऑर्डर झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत सदर  कामाला सुरुवात झालेली नाही. याकामाची सुरुवात तात्काळ करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. येणाऱ्या सात दिवसात जर या कामाची सुरुवात झाली नाही तर महापालिका कार्यालयासमोर एड. शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे  निवेदनात म्हटले आहे.
                 या निवेदनावर प्रा. प्रवीण कांबळे यांसह  पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.  शिवाजी जवळेकर, धम्म उपासक  केशव कांबळे, मनपाचे माजी  सदस्य विजयकुमार साबदे ,संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष हकीम शेख मनपा सदस्य आसिफ बागवान, माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी सभापती बालाजी कांबळे, राजू माने, विकास कांबळे,राज शिरसागर यशपाल कांबळे,राहुल डुमणे,किरण बनसोडे, संजय सुरवसे,राजू सुरवसे संदिपान सूर्यवंशी,बब्रुवान गायकवाड राजू गवळी, माजी मनपा सदस्य दीप्ती खंडागळे,   वर्षा मस्के, बटनपूरकर मॅडम,शोभा ओव्हाळ, अनिता रसाळ, तनुजा कांबळे, सुमित भडीकर,आशितोष मुळे, आकाश मगर ,विशाल त्रिभुवन,विशाल पैठणे,रामकिशन शिंदे,गणेश पवार, राजेश लामतुरे, अतिश कांबळे अजय करमाळे, निलेश देशमुख, दिनेश कापसे, सोनवणे पंकज, दयानंद कांबळे, काशिनाथ बोंमने,देवा पोळ, किशोर मोरे,अजय मुळे, सुरेश गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed