लांबोट्यात विज पडून एक महिला जागीच ठार
बैल व म्हैसही विज पडून दोन जनावरे दगावली
विज पडून लांबोटा येथे एक महिला व म्हैस जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून कलांडी येथे एक बैल दगावला आहे.
निलंगा :-तालुक्यातील लांबोटा येथे आपल्या शेतात म्हैस घेऊन घराकडे जात असलेली महिला उषाबाई लक्ष्मण आवटे वय ४५ वर्षे यांच्यासह म्हशीवर विज पडल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून कलांडी येथील शेतकरी व्यंकट राम सुर्यवंशी यांचा बैल विज पडून ठार झाला आहे.
दिनांक २८ रोजी सांयकाळी अचानक निलंगा शहरासह परीसरात विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला.आणि यात लांबोटा येथील उषाबाई आवटे ह्या म्हैस चारत आपल्या घराकडे येत असताना विजांचा मोठा आवाज झाला व त्या सदरील महिलेचा व त्यांच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे.सदरील मयत महिलेचे प्रेत निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यविधीसाठी प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पश्चात सासू सासरे पति एक मुलगा एक मुलगी असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
अचानक वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तालुक्यातील ताजपूर येथे अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला असून शेकडो हेक्टरवरील ऊस आडवा पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.तर या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेले सोयाबीन वाहून गेले आहे.