पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून डॉ. शिवाजी काळगे यांना विजय मिळवून द्यावा
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
माजी महापौर ॲड. दीपक सूळ यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला संवाद
प्रतिनिधी : लातूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाने डॉ. शिवाजी काळगे यांच्या रूपाने निष्कलंक, चरित्रसंपन्न, उच्च्विद्याविभूषित लोकांच्या कामाला येणारे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत: उमेदवार समजून प्रचार कार्यात सक्रीय व्हावे असे आवाहन राज्याचे माजी वैदिकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

लातूर लोकसभेचे इंडीया (महाविकास) आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. २६ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील माजी महापौर ॲड. दीपक सुळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपस्थित महाविकास आघाडी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला, या प्रसंगी आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, महाविकास आघाडी काँग्रेसचे लातूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, माजी महापौर प्रा.डॉ.स्मिता खानापुरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, संभाजी सुळ, लातुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रामकिशन मदने आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग १० मधील बूथ प्रमुख नागरीक,मित्रपरिवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार देशमुख म्हणाले की, भारतात सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. देशातील पुरोगामी विचाराचे पक्ष भारतात इंडिया आघाडी माध्यमातून निवडणूक लढवत आहे. तर राज्यात महाविकास आघाडी ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे. काँग्रेसचे लातूर लोकसभेचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत, नेत्रचीकीत्सक आहेत, अनेक दशके त्यांनी लातूरमध्ये रुग्णसेवा केली आहे. या उमेदवाराला मतदारापर्यंत घेऊन जाणे हे पदाधिकारी व कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे असे सांगून प्रत्येकाने लातूर लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार डॉ. शिवाजी काळगे मी स्वतः आहे असे समजून काम करून विजय मिळवून द्यावा असे सांगीतले. पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लाखो नागरिकांना डॉ. शिवाजी काळगे यांनी वैद्यकीय सेवा दिलेली आहे. गोरगरीब लोकांना त्यांनी मोफत सेवा दिली आहे.

निष्कलंक चरित्र संपन्न, विद्या विभूषित असे उमेदवार ते आहेत. दिल्लीचे कायदेमंडळ कायदे करण्यासाठी आहे तिथे डॉक्टर काळगे यांना आपणाला पाठवायचे आहे. विरोधी उमेदवारापेक्षा आमचे उमेदवार सरस आहेत
असे म्हणाले. लोकसभेत विद्यमान खासदारांनी किती प्रश्न माडले हे आपणाला माहिती आहे. डॉ.काळगे निवडून आल्यावर संसदेत राज्यातील, मराठवाड्यातील, तसेच लातूर मधील प्रश्न मांडून लातूरकरांना न्याय दतील, यामुळे आता लातूरकरांना ही सुवर्णसंधी आहे.

यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल
उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर लोकसभेचे उमेदवार डॉ. शिवाजी
काळगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी सुळ यांनी केले, तर शेवटी आभार माजी
महापौर दीपक सुळ यांनी मानले.