• Thu. May 15th, 2025

महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांना लातुरलोकसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

Byjantaadmin

Mar 24, 2024

महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांना लातुर
लोकसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद.

मतदारसंघात भेटीगाठी व ग्रामदेवताचे दर्शन, ग्रामस्थांकडून मिरवणूक काढत
शुभेच्छासह प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार.



लातुर प्रतिनिधी-  लातुर लोकसभा मतदारसंघात महाविकस आघाडी काँग्रेस पक्षाकडून स्वच्छ प्रतिमा असलेले,उच्च शिक्षित,नेत्रतज्ञ डॉ.शिवाजी बंडप्पा काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.



उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी लातुर लोकसभा मतदार संघात आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून मतदान संघासह पंचक्रोशीतील नागरिक डॉ.शिवाजी काळगे यांचे उस्फूर्त स्वागत करीत त्यांची मिरवणूक काढून मतदानरुपी आशीर्वाद देत प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करीत आहेत. लातुर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा गावचे डॉ.शिवाजी बंडापा काळगे यांची जन्मभूमी व कर्मभूमी दोन्ही लातुर असून त्यांचे उच्च शिक्षण,वैद्यकीय क्षेत्रातील कार्य,दांडगा जनसंपर्क, मितभाषी स्वभाव या बाबींचा विचार करून काँग्रेस पक्षाने इंडिया (महाविकास) आघाडी चे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. शिवाजी काळगे यांचे नाव घोषित केले आणि या घोषणेनंतर जिल्ह्यात सर्वच स्तरातून आनंद आणि पक्षाने दिलेल्या योग्य उमेदवारी बद्दल समाधान व्यक्त केले जाते आहे. लातुर शहरातील विविध भागात तसेच त्यांचे मूळ गाव असलेल्या राणी अंकुलगा गावातील त्यांचा मित्रपरिवार,नातेवाईक यांच्यासह मतदार संघातील नागरिकांनी या निवडीचे स्वागत करीत आनंद देखील साजरा केला आहे.



अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाने लातुर लोकभेसाठी उमेदवारी जाहीर करताच लातूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.शिवाजी काळगे यांनी मुळ गाव राणी अंकुलगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक , व्यापारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यासह शहर व जिल्ह्यातील ठिकाणी भेटीगाठी सुरू केल्या आहेत या भेटीगाठी दरम्यान त्यांचे जागोजागी उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. नुकतेच इंडिया (महाविकास) आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांनी राणी अंकुलगा गावी जाऊन गावातील लोकांशी संवाद साधत ग्रामदेवताचे दर्शन घेतले. यावेळी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाकली,बसपूर,घुगी,वळसंगी येथील लहान थोर मंडळी, ग्रामस्थ मंडळीनी त्यांची गावात भेट घेऊन विजयाचा विश्वास डॉ.शिवाजी काळगे यांना देत गावातून मिरवणूक काढली.



यासोबत उदगीर येथील ग्रामदैवत उदागीर बाबा यांचे दर्शन घेतले यासोबतच उदगीर मधील अनेकांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी अण्णा हुडे,प्रदेश सरचिटणीस राजेश्वरजी निटूरे सावकार,काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याणजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस उषाताई कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर,शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,शहरप्रमुख पंचाक्षरी,अजित शिंदे तसेच देगलूर रोड येथील स्वामी सर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.या गाठीभेटी दरम्यान उदगीरातील डॉ.रमण रेड्डी, डॉ.बाळासाहेब पाटील,डॉ.दत्ता पाटील, डॉ.तानाजी मोरे, डॉ.बिरादार उपस्थित होते. तर आज रविवार दि.२४ मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी जाऊन लातुर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांची पक्ष पदाधिकारी यांच्या समवेत भेट घेतली यावेळी आमदार धीरज देशमुख यांनी डॉ.शिवाजी काळगे यांन  शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी मनपाचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचीही शहरातील मंठाळे नगर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली,
नंतर लातुर तालुक्यातील चिकलठाणा येथे जाऊन तेथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांचे  पदाधिकार्याची भेट घेतली यावेळी त्र्यंबकस्वामी यांनी त्यांचे स्वागत करून उमेदवारी बद्दल शुभेच्छा देत ग्रामीणभागात मताधिक्य मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातील असे त्यांना यावेळी आश्वस्त केले.



प्रतिष्ठित व्यक्ती, मान्यवर यांच्या या भेटीनंतर सर्व त्यांना प्रचंडमताधिकय्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करीत आहेत. डॉ.शिवाजी काळगेयांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नव
चैतन्य निर्माण झाले आसून त्यांच्या ठिकठिकाणी छोटेखानीमिरवणुका,कौटुंबिक व मित्रपरिवारा कडून स्वागत समारंभ कार्यक्रम केले जात आहेत.लोकसभा मतदार संघ हा पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ल व्हावा यासाठी काँग्रेस, पदाधिकारी, कार्यकर्ते नव्या जोमाने नव्याउमेदीने डॉ.शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कामाला लागले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मागील पाच वर्षात विद्यमान भाजप खासदाराने शेतकरी, युवक,महिला भगिनी यांच्यासाठी ठोस अशी कुठल्याही प्रकारची कामे, मतदार संघातील इतर विकास कामे केली नाहीत यामुळे वरील सर्व समाज घटकांशी संपर्क असलेल्या डॉ.शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीमुळे मतदार संघातील मतदार नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या असून प्रत्येक ठिकाणी नागरिक त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून या निवडणुकीत त्यांना मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी निवडून आणण्याची ग्वाही देत आहेत आणि असे झाल्यास लातुर हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा
होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *