• Wed. Apr 30th, 2025

पवार दाम्पत्याच्या वाढदिवसा निमित्ताने निलंग्यात ८३ जणांचे रक्तदान

Byjantaadmin

Dec 14, 2022

पवार दाम्पत्याच्या वाढदिनी निलंग्यात ८३ जणांचे रक्तदान

निलंग्यातील ५०० महिलांना साडी चोळीचे वाटप

निलंगा, – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा वाढदिवस निलंगा येथे ८३ जणांनी रक्तदान करून, ५०० अनाथ महिलांना साडी वाटपासह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी विलास माने, पंडित धुमाळ, महादेवी पाटील, इस्माईल लदाफ, अंगद जाधव, धम्मानंद काळे उपस्थित होते. यावेळी ८३ जणांनी रक्तदान केले.

यानिमित्त येथील शिवाजी चौकात महाविकास आघाडीच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. केक कापून पवार दाम्पत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी हसन चाऊस, काँग्रेसचे विजयकुमार पाटील, अजित माने, हमीद शेख, दयानंद चोपणे, विनोद आर्य, हरिभाऊ सगरे, सुनील नाईकवाडे, रजनीकांत कांबळे, देवदत्त सूर्यवंशी उपस्थित होते. भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विलास माने यांच्या पुढाकाराने स्टार फंक्शन हॉल येथे सुमारे ५०० महिलांचा साडी चोळी देवून सन्मान – करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed