• Wed. May 14th, 2025

घनकचरा जाळणा-या नागरीकांवर होणार कार्यवाही

Byjantaadmin

Mar 23, 2024

घनकचरा जाळणा-या नागरीकांवर होणार कार्यवाही

महानगरपालिकेमार्फत क्षेत्रनिहाय पथकाची नियुक्‍ती…

     लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात घनकचरा जाळणे हे प्रतिबंधित आहे. काही आस्‍थापना / नागरिक घनकचरा जाळत असल्‍याचे दिसून येत आहे. यावर आळा घालण्‍यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्‍या वतीने पुढील प्रमाणे स्‍वच्‍छता निरीक्षक यांची पथके नियुक्‍त करण्‍यात आली आहेत.

क्षेत्र क्र. A करिता श्री.शिवराज शिंदे मो.न. ८८८८२२८३०६, क्षेत्र क्र.  B करिता  श्री.धोडिंबा सोनवणे मो.न. ९०२८८४७४००, क्षेत्र क्र.  C करिता  श्री.सुनिल कांबळे मो.न. ९८६०६४३८६० व क्षेत्र क्र. D करिता  श्री. अक्रम शेख मो.न. ८२०८३८३४५२.

      दि.२२/०३/२०२४ रोजी सिग्‍नल कॅम्‍प,  गांधी मार्केट, गिरवलकर मंगल कार्यालय या भागात घनकचरा जाळणा-या (०३) तीन आस्‍थापना / नागरिकांवर दंडात्‍मक कार्यवाही करून १५००/-रू. दंड वसुल करण्‍यात आला आहे. यापुढे आस्‍थापना / नागरिकांनी घनकचरा जाळल्‍यास निदर्शनास आल्‍यास नियुक्‍त पथकातील पथक प्रमुख यांचे मोबाईल क्रमांकावर घनकचरा जाळल्‍याचे माहिती देवून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *