• Wed. May 14th, 2025

नाथाभाऊंचा सर्वात मोठा डाव, भाजप बॅकफूटवर, रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात?

Byjantaadmin

Mar 22, 2024

जळगाव : (Raver Lok Sabha Constituency) (BJP) खासदा(Raksha Khadse) विरुद्ध सासरे (Eknath Khadse) अशी लोकसभेची (Lok Sabha Election 2024) लढत पार पडणार, अशी जोरदार चर्चा असताना आता प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं अशक्य असल्याचं जाहीर केलं आहे. एकनाथ खडसे यांच्या माघार घेण्यामुळे आता राजकीय वर्तुळात (Maharashtra Political Updates) अशी चर्चा आहे की, या मतदारसंघातून केवळ एकनाथ खडसे यांना शह देण्यासाठीच भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता एकनाथ खडसे यांनी अचानक माघार घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. खरंतर भाजपच्या वरिष्ठ पातळीवर यंदा जळगाव जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्याचा इरादा होता. परंतु, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची जळगाव येथे पार पडलेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरुन बोलताना थेट एकनाथ खडसे यांची रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपची अडचण झाल्याचं पाहिला मिळाले. दोन दिवसांपूर्वी भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आणि त्यात रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं. एकनाथ खडसे यांच्याविरोधात ही उमेदवारी देण्यात आली खरी, परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्याचं जाहीर केलं. यामुळे आपोआपच भाजपची मोठी अडचण झाल्याचं पाहिला मिळालं आहे. कारण आता इच्छा नसताना देखील रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर तर केली. परंतु आता त्यांचा पत्ता कट केला, तर आपोआपच राजकीय वर्तुळात भाजपची नाचक्की झाल्या शिवाय राहणार नाही. 

एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपला म्हणजेच जळगाव जिल्ह्याचे भाजपचे नेतृत्व करणाऱ्या गिरीश महाजन यांना आपले निकटवर्तीय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपूत्र अमोल जावळे यांना उमेदवारी द्यायची होती. परंतु, एकनाथ खडसे यांना शह देण्याच्या नादात जवळच्या व्यक्तीला डावलत एकनाथ खडसे यांच्या सून आणि सध्याच्या खासदार रक्षा खडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. सध्या राजकीय वर्तुळात अशा देखील चर्चा होत आहेत की, एकनाथ खडसे यांच्या ऐवजी रोहिणी खडसे यांची देखील उमेदवार म्हणून घोषणा होऊ शकते. परंतु, रोहिणी खडसे यांनी मात्र याला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. एबीपी मााझाशी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, मी मागील 4 वर्षांपासून मुक्ताईनगर विधानसभेची तयारी करत आहे. यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे, त्यामुळे सध्या तरी खासदारकीबाबत कोणताही विचार माझ्या मनात नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. 

सूनेची खासदारकी सुरक्षित करताना नाथाभाऊंकडून एका दगडात दोन पक्षी?

अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सभा पार पडली होती. यावेळी एकनाथ खडसे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचं पाहिला मिळाले. खानदेशातील एकनाथ खडसे यांची ताकद पाहून तत्काळ सभेच्या व्यासपीठावरुन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेच आमचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील, अशी घोषणा करुन टाकली. यानंतरच्या काळात माध्यमांमध्ये बोलताना एकनाथ खडसे यांनी आपणच उमेदवार असू असं जाहीररित्या बोलायला सुरुवात केली. तसं चित्र देखील निर्माण केलं. 15 दिवसांपूर्वी तर स्वतः शरद पवार यांच्याशी चर्चा करुन आपणच उमेदवार असल्याच जाहीर देखील केलं. 

राज्यात सासरा विरुद्ध सून लढत होणार का? अशा बातम्यांनी जोर देखील धरला. त्यामुळे भाजपला इच्छा नसताना देखील रक्षा खडसे यांना उमेदवारी द्यावी लागली. एकीकडे उमेदवारी जाहीर होत असताना दुसरीकडे एकनाथ खडसे यांना अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात 137 कोटी रुपयांची नोटीस देण्यात आली होती. या नोटीसीच्या माध्यमातून खडसे कुटुंबातील एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, मुलगी रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ती नोटीस देखील रक्षा खडसे जर उमेदवार असतील तर त्यांना अडचण होऊ नये म्हणून महसूल खात्याच्या वतीनं एसआयटी चौकशीत कारवाईचे आदेश देऊन देखील थांबवण्यात आली. दुसरीकडे भाजपच्यावतीनं कारवाईची प्रक्रिया थांबवत रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली. त्यानंतरच एकनाथ खडसे यांनी आपली निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याचं जाहीर करत माघार घेतली आणि जो पक्ष उमेदवार उभा करु, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आपोआपच एका दगडात दोन पक्षी मारण्यात नाथाभाऊ यशस्वी ठरले. गौण खनिज प्रकरण कारवाई थांबली आणि सूनेची लोकसभेची वाट देखील मोकळी झाली.  

भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या मोठ्याप्रमाणात हालचाली?

भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण एकनाथ खडसे यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एकीकडे नाथाभाऊंच्या माघारीचा निर्णय होत असताना दुसरीकडे रक्षा खडसे यांना बदलण्यासाठी भाजपच्याच वरिष्ठांकडून दबाव टाकला जातोय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा देण्याचा पवित्र घेतला आहे. मुळात भाजपमध्ये राजीनामा सत्राची संस्कृती नाही असं असताना जर पदाधिकारी इतकं मोठं धाडस करत असतील तर नक्कीच दाल में कुछ काला है ची चर्चा सध्या रावेर लोकसभा मतदारसंघात सुरु आहे. याला भरीस भर म्हणजेच की काय एकनाथ खडसे यांचे विरोधक असलेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील आता रक्षा खडसे यांच्या उमेदवारी वरुन नाराजी व्यक्त केली आहे.यासोबतच त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधताना एकनाथ खडसे यांना रक्षा खडसे यांना निवडून आणायचे आहे त्यामुळेच त्यांनी स्वतची उमेदवारी माघारी घेतली आहे आणि आता सुनेसाठी रस्ता मोकळा करुन दिला आहे. खडसे कुटुंब पक्ष वेगळं आहे असं जनतेला दाखवत असले तरी आतून मात्र हे कुटुंब एकच आहे अशी देखील टिका पाटील यांच्यावतीने करण्यात आली आहे. अशातच रावेर लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पार पडणार असल्यामुळे अजून दीम महिना आहे. त्यामुळे भाजप रावेरमध्ये उमेदवार बदलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *