• Wed. Apr 30th, 2025

विभागीय जलतरण स्पर्धेसाठी लातूर ऑफिसर्स क्लबच्या 14 विद्यार्थ्यांची निवड

Byjantaadmin

Dec 13, 2022

विभागीय जलतरण स्पर्धेसाठी

लातूर ऑफिसर्स क्लबच्या 14 विद्यार्थ्यांची निवड

लातूर, (जिमाका) : राज्य शासनच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा एस. एम. आर. जलतरण तलाव येथे शनिवारी झाल्या. या स्पर्धेत ऑफिसर्स क्लबच्या 14 विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यांची विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात युगांधरा घोडके (200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक-प्रथम, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक- द्वितीय, 100 मीटर फ्री स्टाइल-प्रथम), गार्गी सूर्यवंशी (50 मीटर फ्री स्टाइल-प्रथम, 100 मीटर फ्री स्टाइल- द्वितीय, 200 मीटर फ्री स्टाइल-द्वितीय), तनिष्का गित्ते (100 मीटर , 200 मीटर बॅक स्ट्रोक-प्रथम, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक-प्रथम), श्रीरूपा मोरे (100 मीटर बॅक स्ट्रोक-प्रथम, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक-प्रथम), यशश्री सुरवसे (50 मीटर बॅक स्ट्रोक-द्वितीय), यशराज पाटील (50 मीटर, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक-प्रथम), सत्यरंजन  मोरे (50 मीटर बटर फ्लाय-द्वितीय), मायांक बंडे (200 मीटर बॅक स्ट्रोक-प्रथम, 200 मीटर फ्री स्टाइल- प्रथम, 200 मीटर आयएम- प्रथम), ढवळे अर्णव (100 मीटर बॅक स्ट्रोक- प्रथम, 200 मीटर  बॅक स्ट्रोक- प्रथम), अर्णव मुंढे (100 मीटर, 100 मीटर फ्री- प्रथम) यांनी यश मिळविले.

 17 वर्षांखालील वयोगटात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी जगताप (100 मीटर बटर फ्लाय- प्रथम, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक- प्रथम, 200 मीटर आय एम- प्रथम), अभय देवकते (50 मीटर फ्री स्टाइल- प्रथम, 200 मीटर फ्री स्टाइल- प्रथम, 400 मीटर आय एम- प्रथम), आलोक  मंठाळे (50 मीटर फ्री स्टाइल- द्वितीय, ब्रेस्ट स्ट्रोक 50 मीटर -100 मीटर- प्रथम), श्रेयश जाधव 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक- प्रथम) यांचा समावेश आहे.

सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक डॉ. महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ऑफिसर्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष जी. श्रीकांत, क्लब अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., क्लब सचिव तथा उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, क्लब क्रीडा समिती प्रमुख अजित भुतडा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed