• Wed. Apr 30th, 2025

लातुर:छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वच्छता

Byjantaadmin

Dec 13, 2022
माझं लातूर-स्वच्छ लातूर, माझं लातूर-हरित लातूर, माझं लातूर-सुंदर लातूर, माझं लातूर-प्रदूषण मुक्त लातूर साठी ठरलेले ध्येय ठरलेला उद्देश, ठरलेली दिशा पुढे घेऊन जात ग्रीन लातूर वृक्ष टीमने  त्यांच्या कार्याचा अविरत १२९० वा दिवस पूर्ण केला.
शहरातील प्रत्येक रस्ता, गल्ली, ग्रीन बेल्ट, शाळा, महाविद्यालय, समशानभूमी, कबरस्थान, दुभाजक, कॉलनी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, न्यायालय, पोलिस स्टेशन सगळी कडे, सगळी कडे झाडे लावणे, झाडांचे संगोपन करणे, झाडांना पाणी देणे, झाडांच्या छाटण्या करणे, स्वच्छता करणे, कचरा काढणे, कुणी कचरा पेटवला असेल तर तो विझवणे, त्याचे प्रबोधन करणे, प्रशासनास सूचना देणे, प्रशासनास मदत करणे, भित्तीपत्रके मुक्त लातूर, थुंकी मुक्त लातूर, प्लास्टिक निर्मूलन, रक्तदान शिबीर, रुगणांची सेवा Ecobrics
असे विविध उपक्रम सातत्याने सुरू आहेत.
आज
छत्रपती शिवाजी महाराज चौकात मावळा शेजारी स्वच्छता करण्यात आली,
सर्व खुरटे गवत, केरकचरा काढला. फोटोत दाखविल्या प्रमाणे एक ट्रॅक्टर गवत कचरा निघाला. कागदी फुलांच्या झाडांची छाटणी करून त्यांना छान आकार दिला. सर्व झाडांना टँकरद्वारे भरपूर पाणी दिले. प्रात वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाण्याने धूवून घेतला. पुतळा परिसरातील सर्व झाडांना टँकरद्वारे पाणी दिले. आज प्रचंड मेहनत झाली, नुसती धूळ-धूळ असताना ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पदमाकर बागल, ऍड वैशाली यादव,  मनीषा कोकणे, दयाराम सुडे, आकाश सावंत, राहुल माने, अभिषेक घाडगे, विजय मोहिते, बळीराम दगडे, गणेश सुरवसे, शुभम आवाड, शंकरसेन पाटील, सिताराम कंजे, आकाश चिल्लरगे या सदस्यांनी नियोजित कार्य पूर्ण केले.
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या मार्फत मनपा प्रशासनास विंनती करण्यात आली, की मावळा शेजारी सातत्याने स्वच्छता कर्मचारी असावा, जागेचे पावित्र्य राखावे, Vertical Garden पूर्णपणे मोडकळीस आले आहे ते काढून घ्यावे, छत्रपती शिवाजी महाराज चौकाची शोभा कमी होत आहे, मावळ्यांचा पाया ठिसूळ झाला आहे, मावळे कधीही खाली पडू शकतात, त्याची डागडुजी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed