मुंबई : निवडणूकीचे बिगुल वाजत नाही तोच घाटकोपरच्या पंतनगरमध्ये 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने गाडीतून 72 लाख 39 हजार 675 रुपये जप्त केले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर 72 लाखांची रोकड जप्त
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक सीए तर दुसरा इनक्मटॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचे समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिस आणि इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉड अधिक तपास करत आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु
देशात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पोलिस आणि निवडणूक अधिकारी सतर्क झाले आहेत. मंगळवारी रात्री पंतनगर पोलिसांनी गस्त घालत असताना एक संशियत गाडी थांबवली आणि तपासणी केली. या गाडीत पोलिसांना 72 लाख रुपयांची रोख आढळली आहे. मंगळवारी रात्रीपासून निवडणूक अधिकारी आणि आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.

गाडीसह दोन जण ताब्यात
पोलिसांनी पकडलेल्या गाडीमध्ये दिलीप नाथानी, अतुल नाथानी हे दोन व्यक्ती होते, हे इनकम टॅक्स सल्लागार असल्याची सुत्रांची माहिती आहे. पंतनगर पोलिसांसह त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हे पैसे कोणाचे आहेत आणि कशासाठी नेले जात होते, याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र याबाबत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
72 लाख 39 हजार 675 रुपये जप्त
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि दुसरीकडे निवडणूक कक्षाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी रात्री मुंबईतील घाटकोपर भागातील पंथनगरमध्ये निवडणूक कक्षाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने 72 लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. निवडणूक कक्षाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने एका कारमधून 72 लाख 39 हजार 675 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एक सीए आणि दुसरा इनकम टॅक्स सल्लागार
ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांपैकी एक सीए आणि दुसरा इनकम टॅक्स सल्लागार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही रक्कम वाशी, नवी MUMBAI येथील एका विकासकाची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार वृषाली पाटील, आयकर अधिकारी यांना माहिती दिली आहे. सर्व यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.