• Thu. May 8th, 2025

बाबा रामदेव यांना सर्वोच्च झटका! सुनावणीवेळी हजर राहण्याचे दिले आदेश

Byjantaadmin

Mar 19, 2024

नवी दिल्ली | 19 March 2024 : योगगुरु रामदेव बाबा आणि त्यांची कंपनी पतंजलीला झटका बसला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरण पतजंलीवर शेकण्याची चिन्हं आहेत. याप्रकरणात बाबा रामदेव यांना दिलासा मिळण्याची चिन्हं नाहीत. पतंजलीचे आयुर्वेदीक उत्पादनं आणि उपचारासंबंधीच्या दाव्या संदर्भात जाहिरातीत जो काही दावा करण्यात आला आहे, त्याविरोधात अवमानाना कारवाई सुरु आहे. याप्रकरणात मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता योगगुरु रामदेव बाबा आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांना व्यक्तिशः हजर राहाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. ही वार्ता SHARE MARKET येऊन धडकताच पंतजली फूड्सच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण दिसून आली.

नेमकं प्रकरण काय

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणीदरम्यान बाबा रामदेव यांच्यावर लसीकरण अभियान आणि आधुनिक औषधीविरोधात मोहिम छेडल्याचा आरोप लावण्यात आला आहे. न्या.हिमा कोहली आणि न्य. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने कंपनी आणि बालकृष्ण यांच्याविरोधात यापूर्वी बजावलेल्या नोटीसला उत्तर न दिल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांच्याविरोधात अवमानना कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केली. कोर्टाने आज रामदेव बाबा यांना नोटीस बजावत, त्यांच्याविरोधात अवमान केल्याप्रकरणात कार्यवाही का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली.

कंपनीच्या शेअरमध्ये घसरण

कोर्टाच्या आदेशानंतर पतंजली फुड्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. BSE च्या आकड्यांनुसार पतंजली फुड्सच्या शेअरमध्ये 3.15 टक्के म्हणजे जवळपास 44 रुपयांची घसरण दिसून आली. घसरणीसह हा शेअर 1372 रुपयांवर व्यापार करत आहे. तर व्यापारी सत्रात या शेअरने 1342.05 रुपयांचा निच्चांक पण गाठला. आज कंपनीच्या शेअरमध्ये किंचित घसरण होऊन तो 1410.10 रुपयांवर उघडला होता. एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 1416.60 रुपयांवर बंद झाला होता. आकड्यांनुसार कंपनीचे मूल्यांकन 50 हजार कोटी रुपयांनी घसरले. प्रकरणात आता पुढे काय होते, याकडे गुंतवणूकदार आणि ब्रोकर्सचे लक्ष लागले आहे. त्यानुसार, या शेअरमध्ये चढउताराचे सत्र दिसून येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *