महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर बँक कॉलनी निलंगा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
निलंगा:- येथील महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर बैंक कॉलनी निलंगा या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक् स्थानी महाराष्ट्र डी. फार्मसी, कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके उपस्थित होते या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दापका ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा निलंगा तालुका अल्पसंख्यांक कॉग्रेस सेल चे अध्यक्ष लाला पटेल, तसेच परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती काशिनाथाप्पा आग्रे, सुरेश धुमाळ, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन नटवे, बी. एन झरे, एस.एस. झरकर, मलिले एल.एन., सेवानिवृत्त मु. अ. पाठक, लगळी सर, घाडगे, राहुल घोडके, जेष्ठ पत्रकार झटींग (अण्णा) म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल काशिनाथ मिरगुडे यांनी प्रस्तावनेत सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत उतरणे किती आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन करताना यामध्ये विद्यार्थ्यांचा, पालकांचा सहभाग महत्वाचा असून शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्दर्शन केले तर विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकेल म्हणून तसेच त्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला विविध शालेय उपक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ. चौधरी व कु. कारंजे यांनी परिश्रम घेतले. श्री. गोणे आर. एस. यांनी सूत्रसंचलन केले, श्री. भोयबार ए. एम. यांनी आभार मानले.

या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे बालवाडीतील विद्यार्थ्यांचा “पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब” या गीतावर व छ. शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा पाळणा तसेच अंबाबाईचा गोंधळ आदीसह इतर गीतांच्या सर्व बाल कलाकारांनी आपल्या नृत्यातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले.