आमदार धीरज देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता ; रेणापूर बाजार समितीकडून जनावरांचा बाजार सुरू
लातूर -रेणापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी बाजार समितीकडून जनावरांचा बाजार सुरू करण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करत रेणापूर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेवुन लातुर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि १५ रोजी जनावरांचा बाजारांचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे उपसभापति अँड शेषराव हाके सन्माननीय संचालक मंडळ यांच्या हस्ते शेतकरी, व्यापारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला यामुळें रेणापूर तालुक्यातील पशू मालकांना मोठी मदत होणार आहे दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याबद्दल या तालुक्याचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे तालुक्यातील शेतकरी, व्यापारी बांधव यांचेकडून कौतुक केले जात आहे .

लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील जनावरांचा बाजार मराठवाडयात प्रसिद्ध होता परंतु बाजारात व्यापारी शेतकरी यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा नसल्याने हा बाजार मोडकळीस आला होता जनावरांच्या बाजाराचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी लातुर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने जनावरांच्या बाजारासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासह बाजार सुरू करण्यासाठी तयारी केली होती त्यानुसार शुक्रवारि यापूर्वी ज्या ठिकाणी बाजार भरत असलेल्या ठिकाणीच जनावरांच्या बाजारांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सभापती उमाकांत खलंग्रे , उपसभापती ॲड . शेषेराव हाके पाटील संचालक जनार्धन माने , कमलाकर आकनगिरे ॲड शिरीष यादव,प्रवीण माने, ॲड मुरलीधर पडोळे, विश्वनाथ कागले, प्रकाश सुर्यवंशी,अमर वाकडे प्रमोद कापसे, राजाभाऊ साळुंके, बाळकृष्ण खटाळ , उमेश सोमानी , प्रदिप काळे ,सचिन इगे , शहाजी पवार यांच्यासह शेतकरी, व्यापारी आदी मान्यवर होते
__
बाजाराला गतवैभव प्राप्त करण्यासाठी बाजार समितीचा पुढाकार
रेणापूर शहरात पुर्वी बाजार भरत होता माञ सुविधे अभावी बंद होता याकडे आमदार धीरज देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून जनावरांचा बाजार सुरू करण्याचे आश्वासन निवडणुकीत दीले होते त्या आश्वासनाची पूर्तता संचालक मंडळाने केली आहे त्यानूसार नूतन बाजार जनावरांच्या बाजारांचा शुभारंभ झाला आहे . यावर्षी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेवुन बाजारात पाण्याची सोय व तात्काळ दाखला नोंदणी व जनावारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यापाऱ्याना राहण्यासाठी निवासस्थानाची सोय ही करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे यांनी यावेळी बोलताना दिली यामुळें व्यापारी व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे . अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याने बाजाराला नक्कीच गतवैभव मिळेल, असा विश्वास व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात आला असून आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे व्यापारी शेतकरी बांधव यांचेकडून आभार व्यक्त करण्यात आले.