माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी
लातूर लोकसभा निवडणूक अनुषंगाने पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी केली चर्चा
LATUR राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. १५ मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यासह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या निवेदनाचा व निमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.

तसेच लातूर जिल्हयासह परीसरातून आलेल्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी लातूर लोकसभा निवडणूक अनुषंगाने चर्चा केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भाई नगराळे, सरचिटणीस अमर खानापुरे, सचिव अभय साळुंखे, ट्वेन्टीवन शुगरचे व्हॉइस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन रवींद्र काळे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडीले, संचालक युवराज जाधव, तुकाराम पाटील, लक्ष्मण पाटील, आनंद पाटील, सुभाष घोडके, सुधीर गोजमगुंडे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती प्रीती भोसले, डॉ. अशोक पोद्दार, डॉ.अनिल राठी, डॉ.आशिष चैपुरे, अजित माने, हमीद शेख, मारुती पांडे, प्रवीण सूर्यवंशी, डॉ.अरविंद भातंबरे, पंकज शेळके, सोनू डगवाले, महेश देशमुख, दीपक राठोड, के.आर सूर्यवंशी, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, महाराणा प्रताप नगरचे उपसरपंच राजकुमार पवार, सतीश देवणे, किशोर बिदादा, व्ही.के आचार्य, धर्मराज बिडवे पापू मलवाडे अनिल मेनकुदळे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविधपदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
