कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवीण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य धान्य आवारातील विविध विकास कामाचे भूमिपूजन
लातूर प्रतिनिधी : -लातूर शहराची सर्वांगीण प्रगती होत असताना, कष्टकऱ्यांच्या जीवनात, आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासह आरोग्य शिक्षण व इतर सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली आहे.लातूरच्या अर्थकारणाचा आत्मा असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा लौकिक आणि वैभव वाढवण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व काही केले जाईल अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मार्केट यार्ड आतील विविध विकास कामाच्या शुभारंभ गुरूवार दि. १४ मार्च रोजी करण्यात आला या प्रसंगी बोलतांना दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार धिरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, माजी सभापती ललितभाई शहा, विलास बँकेचे अध्यक्ष किरण जाधव, उपाध्यक्ष समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, सभापती जगदीश बावणे, उपसभापती, सुनील पडीले, सचिव भगवान दुधाटे सर्व संचालक मंडळ, शेतकरी,ज्येष्ठ व्यापारी त्यांच्यासह बाजार समितीमधील सर्व घटकांचे प्रतिनिधी, मान्यवर मंडळी या यावेळी उपस्थित होते.

यावेळी पूढे बोलतांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, बाजार समितीमधील व्यवहारावर लातूर मधील इतर क्षेत्रातील व्यवसाय आणि व्यापार अवलंबून आहे त्यामुळे भविष्याचा विचार करून या ठिकाणी नव्याने सोयी सुविधा निर्माण करण्यासंदर्भात सर्वांच्या सूचना घेऊन संचालक मंडळांनी यापुढे निर्णय निर्णय घेऊन त्यावर लगेच अंमलबजावणी करावी. शेतीमाल निर्माण होऊन तो बाजारपेठेपर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी, ठिकाणी गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, आणि वाहतुकीच्या व्यवस्था उभाराव्यात, बाजार समितीमार्फत मुलींचे वस्तीगृह बांधून पूर्ण झाले आहेत, हे वस्तीगृह बांधण्यासाठी ज्या व्यापाऱ्याने आपली दुकाने दिली त्यांना नवी दुकानात त्वरित उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कारवाई करावी, बाजार समिती परिसरात, आणखी ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथे रस्ते, नाल्या बांधण्या संदर्भात तसेच कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठ्याची सुविधा, सीसीटीव्ही पथदिवे यासंदर्भात येथील सर्व घटकांची विचार विनिमय करून निर्णय घ्यावेत, काळाची गरज ओळखून वेळ न दवडता नवीन बाजार समिती उभारणीच्या कामालाही आता सुरुवात करण्यात येणार आहे, कालबद्ध कार्यक्रमाखून बाजार टप्प्याटप्प्याने नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची योजना राबवावी बाजार समिती स्थलांतरित झाल्यानंतर या ठिकाणीही, लातूरची गरज लक्षात घेऊन, गंजगोलाईच्या धरतीवर अद्यावत, सुसज्ज व्यापार पेठ उभारण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही संचालक मंडळाला याप्रसंगी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख दिल्या आहेत.

आपली बाजार समिती ही अनेक दशकांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत – आमदार धिरज विलासराव देशमुख
माजी मंत्री तथा सहकारमहर्षी आदरणीय श्री. दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपल्या बाजार समितीची वाटचाल सक्षमपणे सुरू आहे. आपली बाजार समिती ही अनेक दशकांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहे. शेतकरीहिताचे काम करीत बाजार समितीने राज्यात लौकिक प्राप्त केला आहे असे आमदार धिरज विलासराव देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले. पढे बोलतांना आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले, लातूर बाजार समितीतील सोयाबीन, तुरीचे दर पाहून राज्यातील इतर बाजार समितीत शेतीमालाचे दर ठरतात, ही लातूरसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. म्हणूनच राज्यातील अग्रगण्य बाजार समितीपैकीही एक बाजार समिती आहे.

बाजार समितीचे हे कार्य, तिचा लौकिक अधिक उंचावण्यासाठी संचालक मंडळ कार्य करीत आहे. बाजार समितीने बदलत्या काळानुसार मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. येणाऱ्या काळात लातूर रेशीम कोशाचे हब झाले पाहिजे, यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न व्हावेत. निर्यातक्षम द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट फळासाठी, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेअर हाऊस, कोल्ड स्टोअरेजसुविधा तयार कराव्यात. देवणी गोवंशाला प्रोत्साहन द्यावे. प्रक्रियाउद्योग, जोडधंदे यातून शेतकरी सक्षम झाला पाहिजे यासाठी ग्रुप फार्मिंग, शेतकरी उत्पादक गटांना प्रोत्साहन द्यावे. त्यांना मार्गदर्शन करावे, अशीअपेक्षा व्यक्त केली. लातूर बाजार समिती बरोबरच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी हित केंद्रबिंदू मानून कार्यरत आहे. जिल्हा बँकेने केवळ ऊस उत्पादकच नव्हे हरभरा, सोयाबीन आदी पिकांसाठी शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना १,८०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज वाटप केले. तसेच, ४०३ उच्च शिक्षणाच्या मंजूर प्रस्तावासाठी १५ कोटी रुपये, ट्रॅक्टर खरेदीच्या ३१० प्रस्तावासाठी २० कोटी रुपये, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाच्या

शुभमंगल योजनेच्या ३,८०० प्रस्तावासाठी २३ कोटी रुपये, रेशीम शेतीसाठी २कोटी २६ लाख रुपये, दुग्ध व्यवसायासाठी ३ कोटी रुपये, कृषी पायाभूत सुविधेसाठी ३ कोटी रुपये कर्ज वाटप केले. तुषार व ठिबक सिंचनासाठी तसेच १०४ ऊसतोडणी यंत्रासाठी १२० कोटी रुपयांचे कर्जवाटप शेतकरी बांधवांना केले. यातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण झाला, अशी माहिती यावेळी आमदार धिरज देशमुख यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती जगदीश बावणे यांनी करून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर अनंतवाड व अरविंद पाटील यांनी केले तर शेवटी आभार संचालक युवराज जाधव यांनी मानले.