• Sat. May 3rd, 2025

महायुतीला लोकसभेसाठी मनसेची साथ?

Byjantaadmin

Mar 14, 2024

मुंबई : आगामी Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये अद्याप जागावाटपाचा तिढा सुटत नाही, तेवढ्यात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 1 ते 2 जागा (MNS) सोडण्यासाठी (BJP) आणि (Shiv Sena) तयार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, महायुतीसोबत लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचाही पर्याय असेल. महत्त्वाची बाब म्हणजे, महायुतीकडून मनसेला महायुतीच्याच चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण मनसेनं हा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती मिळत आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाची लोकसभा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत बंडाळीमुळे चुरशीची ठरणार आहे. अशातच आतापर्यंत लोकसभा लढवायची की नाही, याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य न करणारी मनसे मात्र आता लोकसभेच्या फ्रेममध्ये आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असल्यानंच राज ठाकरेंनी mumbaiतले सगळे दौरे रद्द केल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, वाटाघाटी ‘ऑल वेल’ झाल्यास मनसे महायुतीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे महायुतीत दाखल होण्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेच्या शिष्ठमंडळानंही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. तसेच, मनसेला आपल्यासोबत कसं घेता येईल, याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींमध्येही चर्चा सुरू होती. पण आधी दोन पक्षांसोबत युती असताना, त्यात मनसेलाही सहभागी करुन घेणं आणि त्यात जागावाटपाचा प्रश्न यांवर तोडगा काढण्याचं काम भाजपकडून सुरू होता. 

महायुतीचं जागावाटप अद्याप रखडलेलंच, त्यात मनसेची एन्ट्री

अद्याप महायुतीचा लोकसभेसाठीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जागावाटपाच्या अनेक बैठका निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून जास्त जागांची मागणी होत आहे, त्यासाठी शिंदे आणि अजित पवारांवर दबाबतंत्रही वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे. अशातच जर मनसेची एन्ट्री झाली, तर तिघांपैकी कोणाना कोणाची तरी जागा मनसेच्या खात्यात जाईल. आता मनसे जर महायुतीत आली आणि लोकसभा लढवली, तर त्यांच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *