• Fri. May 2nd, 2025

बारामतीत लढणार म्हणजे लढणारच, विजय शिवतारे ठाम, अजित पवारांवर तोफ डागली

Byjantaadmin

Mar 13, 2024

पुणे: अजित पवार यांनी ठरवून पाडलेले नेते विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा पावरांविरोधत शड्डू ठोकला आहे. विजय शिवतारे बारामती लोकसभेसाठी अपक्ष उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सासवड येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बारामती लोकसभेला तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. यामुळे सुनेत्रा पवारांच्या मतांवर मोठा फरक पडू शकतो.

दोन दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी पुण्यात पावरांविरोधात भाष्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा विजाय शिवतारेंनी आपण अपक्ष लढणार हे ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे दोन्ही पवारांचे टेन्शन वाढेल आहे.इतकंच नाही तर शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर घणाघाती टीका केली. अजित पवार हे उर्मट आहेत, असं बारामतीकरांचं मत असून ते अजित पवारांना मत देण्यापेक्षा सुप्रिया सुळेंना मत देतील, असंही शिवतारे म्हणाले. तसेच, अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली, असंही ते म्हणाले.

शिवतारे निवडणूक लढण्यावर ठाम

एकमताने बारामतीतून लढण्यावर कार्यकर्त्यांकडूनउमेदवारीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही, लोकसभा मतदारसंघ आहे, कोणाची मालकी नाही, त्यामुळे पवार पवार करण्याऐवजी आपण लढायचं, असं शिवतारे म्हणाले.२०१९ च्या निवडणुकीत मी त्यांच्या मुलाविरोधात प्रचार केला होता. ते राजकीय होते मी वैयक्तिक पातळीवर तो केला नव्हता. पण अजित पवारांनी सभ्यतेची सर्वात नीच पातळी गाठली. जेव्हा माझी प्रकृती बरी नव्हती तेव्हा रुग्णवाहिकेतून प्रचार केला. तेव्हा अजित पवार म्हणाले, मरायला लागले आहात तर कशाला निवडणूक लढवता. खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती घेताय असं म्हणाले होते. तू कसा निवडून येतो हे मी बघतो, असंही ते म्हणाले. अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. त्यांना मी माफ केलं. तरी त्यांची गुर्मी तशीच होती. जेव्हा मी बारामती फिरलो तेव्हा मला असं दिसून आलं की अजित पवार उर्मट आहेत म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतं देऊ, असं लोकांचं मत झालं आहे. लोकांचं असं झालंय की एका बाजुला लांगडा, एका बाजुला वाघ, कुठल्याही पिंजऱ्यात टाकलं तरी तेच. मग ते मतदान कसं करणार. ६८६००० मतदार हे पवारांच्या समर्थनात आहेत. तर ५५०००० पवार विरोधात आहेत. त्यांना ना सुप्रिया सुळेंना मत द्यायचं आहे ना सुनेत्रा पवारांना. आवडत्या उमेदवाराला मतदान करण्याची संधीच मिळाली नाही, तर तो लोकशाहीचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचा घात होतोय असं लक्षात आलं, असंही ते म्हणाले.

माझी पुरंदरचे लोक बोलतात आम्हाला बदला घ्यायचाय. मी बोलत नाही. जेव्हा पवार साहेब स्वत: माझ्या नातवाच्या बोलण्याला कडवीमोलाची किंमत नाही असं म्हणाले, तेव्हाचं सारे संपलं. तुम्हाला घर सोडून जावं लागलं, सकाळचा शपथविधी घ्यावा लागला तेव्हाच संपलं. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे हे सर्वांना माहिती आहे.घराणेशाहीला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

आम्हीच पुणे जिल्ह्याचे मालक अशी यांची मानसिकता, ही मानसिकता मोडली पाहिजे. फसवेगिरी करणं हे आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात ते (अजित पवार) वावरतात, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली.लोकशाहीत कोणी ना कोणी धाडस केलं पाहिजे लोकांची बाजू मांडली पाहिजे, प्रस्थापितांविरोधात दंड थोपटून उभं राहिलं पाहिजे, असंही शिवतारे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *