लातूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदनियुक्त्या जाहीर
– युवा प्रदेशाधक्षपदी मिथुन दिवे तर जिल्हाध्यक्षपदी गजानन गजानन बोळंगे यांची निवड
लातूर -लातूर येथील अंजनी हॉटेल येथे आज 11 मार्च रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत संपन्न झालेल्या शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत वरिष्ठ पदाधिकार्यांच्या हस्ते पदनियुक्त्या देण्यात येऊन त्यांचे संघटनेत स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी मिथुन दिवे तर जिल्हाध्यक्षपदी गजानन बोळंगे, जिल्हा सचिव म्हणून राजकुमार नागरगोजे यांची निवड केली आहे.

या प्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, राज्य उपाध्यक्ष सुुरेंद्र अंबुलगे, जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे, मराठवाडा संपर्क प्रमुख महादेव कोठे, युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उजळंबे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय देवाप्पा तसेच मार्गदर्शक दगडू पडिले यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष श्रीमंत घुले, जिल्हा युवा आघाडीचे सरचिटणीस सिद्धेश्वर सावंत,
लातूर तालुकाध्यक्ष मारूती साळुंके, कार्याध्यक्ष आदीनाथ सूर्यवंशी, रेणापूर तालुका अध्यक्ष सचिन निकम, उपाध्यक्ष अच्युत करमुडे, कार्याध्यक्ष अर्जुन जाधव, देवणी युवा तालुकाध्यक्ष दत्तात्रय अर्जुने, तालुका संघटक शंकर बावचे, सचिव योगेश तगरखेडे, कार्याध्यक्ष करीम शेख आदींसह जिल्ह्यातील ,शाहूराज लोभे ता अ निलंगा
मेघराज रणखांब ता उपाध्याक्ष् तालुकानिहाय पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करून नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थित शेतकरी सदस्यांना व नवनियुक्त पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीचे सुत्रसंचलन दत्तात्रय लोभे यांनी केले तर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी आभार मानले. या बैठकीला जिल्हाभरातून शेतकरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.