मनोज जरांगे पाटील यांची 13 मार्च ला निलंगा शहरात संवाद बैठक
निलंगा:-मराठा आरक्षणासाठी तीव्र लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील निलंगा तालुक्यातील तमाम मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत त्यानिमित्ताने त्यांची संवाद बैठक निलंगा शहरात आयोजित करण्यात आली आहे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट ओबीसींमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्र भर तीव्र लढा उभा केला आहे, अंतरवाली सराटी येथे त्यांनी आमरण उपोषण करून आपल्या मागण्या सरकार समोर ठेवल्या होत्या सरकारने मागण्या मान्य करू असा शब्द दिला होता तो शब्द सरकारने पाळला नाही,सगेसोयरे कायदा पारित करून मराठा समाजाला न्याय द्यावा ही मागणी अखंड मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे मात्र याबाबद शासनाकडून निर्णय झालेला नाही.त्यामुळे जरांगे पाटील विविध ठिकाणी भेटी देऊन समाज बांधवांशी संवाद साधत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी शासकीय विश्रामगृह निलंगा येथे व्यापक बैठक घेऊन या संवाद बैठकीचे नियोजन केले आहे. जरांगे पाटील बुधवार दि.13 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वा. निलंगा शहरात आगमन करणार आहेत,शेकडो मोटारसायकल रॅलीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून निलंगा शहरातील वृन्दावन मंगल कार्यालयात ही संवाद बैठक पार पडणार असून निलंगा तालुक्यातील व परिसरातील मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
