• Thu. May 1st, 2025

फिनिक्स फाउंडेशन लातुर येथे आयोजित पाच दिवसीय इंटर्न प्रशिक्षण शिबीर संपन्न

Byjantaadmin

Mar 10, 2024

फिनिक्स फाउंडेशन लातुर येथे आयोजित पाच दिवसीय इंटर्न प्रशिक्षण शिबीर संपन्न

latur -वातावरण बदल व त्याचे विपरीत परिणाम सध्या जगाला भेडसावणारी समस्या असुन,यावर उपाययोजना शोधण्यासाठी जगभरातील हवामान तज्ज्ञ अविरत संघर्ष करत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाने सुद्धा याबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.फिनिक्स फाउंडेशन लोदगा जि. लातूर ही संस्था भारतातील एकमेव अशी संस्था आहे जी शासनाच्या विविध उपक्रमामधून हवामान बदल यावर वारंवार प्रकाशझोत टाकत असते. फिनिक्स फाउंडेशन चे अध्यक्ष पाशा पटेल यांनी हवामान बदल व त्याचे विपरीत परिणाम याचा अभ्यास करत असताना जगभरातील संशोधनाचा आढावा घेत लातुर येथे फिनिक्स फाउंडेशन संस्थेमधून बांबु लागवड व हवामान बदलास पुरक पर्यायी शेती याबत संशोधन सुरु केले आहे. बांबूची विशेष वैशिष्ट्य पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करतातंच पण बांबूचे आर्थिक फायदे व प्रक्रिया उदयोगातून तयार होणारे उत्पादने शेतकऱ्यांचे शास्वत उत्पादन वाढवण्यास उपयुक्त आहे, हे गमक या संस्थेने ओळखले. याचाच भाग म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा अभियान संचालनालय व फिनिक्स फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने 16 प्रशिक्षणार्थी यांना बांबू लागवड अभियानास चालना देण्यासाठी, मनरेगा अंतर्गत बांबू लागवड करण्याविषयीं मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, बांबुचे आर्थिक, सामाजिक व औषधी फायदे, बांबु प्रक्रिया उद्योग व भविष्य याबद्दल सविस्तर प्रशिक्षण दिनांक 03 मार्च ते 08 मार्च दरम्यान देण्यात आले. या पुढे अश्या प्रकारचे  प्रशिक्षण व बांबू विषयी जनजागृती करीता आमची संस्था अविरत कार्य करणार असल्याचे संस्थेचे समन्वयक परवेज पाशा पटेल यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *