सोलापूरः एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी केलेला विवाह नवरदेवाला मोठा दिलासा मिळाला आहे. नवरदेव अतुल अवताडे यांच्याविरोधात अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच, राज्य महिला आयोगानेही नवरदेवाविरोधात कारवाई करावी, असे आदेश दिले होते. मात्र, आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अतुल अववताडेला मोठा दिलासा मिळाला आहे.
अतुल उत्तम अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर २ मध्ये राहणाऱ्या तरुणाने शुक्रवारी (२ डिसेंबर) अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला होता. या अनोख्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर ही माहिती समोर आली. दरम्यान, माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबतची तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती.
दरम्यान, न्यायालयाने पोलिसांना या दाम्पत्याची चौकशीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळं पोलीस तपासाचा मार्ग बंद झाला आहे. याविषयी अकलूज dysp शिवपूजे यांनी माहिती दिली आहे.
कायदा काय सांगतो?
नवरदेवाने जुळ्या बहिणीसोबत एकाच मांडवात विवाह केल्याने कलम ४९४ अंतर्गंत हे लग्न येत नाही. त्यांनी कायद्यातून पळवाट काढत हा विवाह केला आहे. तसंच, एकत्र लग्न झाल्याने पत्नीच्या विरोधाचा प्रश्नच नाही त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. जोपर्यंत पहिला जोडीदार तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. मात्र, या लग्नाची कायदेशीर नोंद होत आहे. दुसरं लग्न हे वैध ठरत नाही.