भव्य आरोग्य शिबीरात सातशे रूग्णांना मोफत औषधी वाटप.
भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम
निलंगा/प्रतिनिधी
भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबुलगा बु येथील भव्य आरोग्य शिबीरात सातशे रूग्णांना मोफत औषधी वाटप व तज्ञ डॉक्टरने तपासणी केली आहे.
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील कन्या विद्यालयात दिनांक ९ मार्च रोजी भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत सर्वरोगनिदान आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते.या शिबीराची सुरवात साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन गावचे सरपंच स्वाती शिंदे व सुभाष म्हेञे यांच्या हस्ते दिपप्रल्वन करून करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर माजी प.स.सदस्य वामनराव भालके,नरसिंग म्हेञे,दशरथ गोडगे,राजेश सुर्यवंशी,दिलीप मिरगाळे,शिवाजी शिंदे,मु.अ.ज्ञानोबा घाडगे,उमेश होरे,शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब बिरादार,तंटामुक्त अध्यक्ष नाना काकडे,आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ शेषराव शिंदे,डॉ.नरेंद्र माकणे,-हदयरोग तज्ञ श्रीधर अहंकारी,दंतरोग तज्ञ डॉ भिम खलंगरे,-दयरोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर कदम,बालरोग तज्ञ डॉ नारायाण नागमोडे,फिजिसिएन डॉ मन्मथ गताटे,स्ञीरोग तज्ञ डॉ प्रतिभा दिनकर पाटील,डॉ साईनाथ कुडुंबले,डॉ समीर तळीखेडकर,डॉ श्रीपती नलमले,डॉ उध्दव जाधव,डॉ निलेश लंबे,स्ञीरोग तज्ञ डॉ वैशाली हतागळे,मधूमेह तपासणी डॉ पंकज धनगे,नेञतज्ञ डॉ सतिश पांचाळ,स्ञीरोग तज्ञ डॉ गिरीधर सुर्यवंशी,डॉ प्रतिभा येळकर,आदि तज्ञ डाॕक्टरानी या सर्वरोग निदान मोफत तपासणीत सेवा दिली असून स्ञीयांचे आजार,लहान बाळांचे आजार,दमा,ताप,पित्त,मानपाठ दुखणे,संधीवात,महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या डोळ्यांच्या समस्या,ईसीजी,बीपी,रक्त तपासणी शुगर तपासणी आदि तपासण्या सातशे पेक्षा जास्त रूग्णांना या शिबीरात तपासणी व मोफत औषधी वाटप करण्यात आली आहेत.या शिबिरासाठी संदीप पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र अंबुलगा बु येथील पाटील आर.एस,गटप्रवर्तक अर्चनाताई बिरादार,एस.आर.बिरादार,के.एस.गोणे,जे.एस.मिर्झा,आर.आर.जाधव,एस.आर बिरादार,यु.एन.बाबले,एस.यु.बायस्कर,टी.एम.शिंदे,एन.एस.शिंदे,बी.एस.कपाटे,टी.एम.खांडेकर आदि कर्मचाऱ्यांसह २० आशा कार्यकर्त्यांनी सदरील शिबीरात मेहणत घेतली आहे.