जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर च्या वतीने निलंगा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी संपन्न.
प्रतिनिधी/निलंगा
निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालययात चिंतामण परांजपे दृष्टीदान प्रकल्पांतर्गत विवेकानंद रुग्णालय, समाज कल्याण विभाग, लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर कार्यन्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्प, हरंगूळ (बु) व उपजिल्हा रुग्णालय, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.

या शिबिरात ८८ दिव्यांग विद्यार्थी व १२ विशेष शिक्षक, काळजीवाहक यांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर चे स्थानिक समिती सदस्य, वैजनाथ व्हणाळे, उपजिल्हा चिकित्सक कार्यालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हुगे सर , डॉ. श्रीमती चव्हाण, कु. प्रतिक्षा शिंदे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर चे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बस्वराज पैके, मानसोपचार तज्ञ, नवाज शेख, विवेकानंद रुग्णालयाचे सौ गोपिका सौदागर, श्रीमती सुवर्णा शेटे, श्री श्रीकांत तुरटवाड, श्री संतोष खटोल, श्री राजा ठाकूर, श्री लक्ष्मण वाघमारे, दिव्यांग विद्यार्थी, विशेष शिक्षक काळजी वाहक, पालक व मान्यवर उपस्थित होते. या तपासणी शिबिरामध्ये एकूण ६ दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.