रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर अस्पिरेशनच्या वतीने आयोजित व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर -गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग आणि प्रतिबंध या विषयवार ‘गोष्ट सर्वायकल कॅन्सरची’ या महितीप्रद व्याख्यानाचे आयोजन रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर अस्पिरेशनच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमात लातूर शहरातील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ . स्नेहल देशमुख आणि डॉ . वैशाली दाताळ यांनी उपस्थित महिलांना कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार याबद्दल सखोल आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. या प्रसंगी त्यांनी मुलींमध्ये घेण्याची लस आणि त्याची परिणामकारकता याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी क्लबच्या वतीने जगतिक महिला दिनानिमित्त सौ . ज्योती राजेमाने ( योग प्रशिक्षक ), श्रुती मुंदडा ( केक मेकर ), सौ . माधुरी वलसे ( आदर्श शिक्षिका ) आणि सौ . रजनी वैद्य ( हस्त कला प्रशिक्षक ) या समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा देखील सन्मान करण्यात आला.उपस्थित महिलांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांची भेट देण्यात आली आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सौ. अर्चना लड्डा, सौ . आनंदा कोचेटा, सौ. स्वर्णिमा कोचेटा, सौ. संगीता सोनकवडे, सौ . कौशल्या सोनकवडे ,सौ. शकुंतला परदेशी ,सौ. सोनाली पेन्सलवार , वनिता लाचुरीया, सौ. मैना कावळे , सौ. नीता इंगळे , सौ. कविता जोशी , सौ स्मिता दगडे, सौ . अर्चना होळीकर, विजय व्हसाळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब लातूरचे अध्यक्ष रो. जांबुवंतराव सोनकवडे आणि सचिव रो. महेंद्र जोशी , सौ. निर्मला सोमाणी आणि रो . सुधीर ईटकर यांनी मार्गदर्शन केले.