महाराष्ट्र फार्मसीत राज्यस्तरीय प्रश्न मंजूषा कार्यक्रम संपन्न
निलंगा-महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा येथे नुकताच पार पडला. या स्पर्धेत राज्यभरातून 29 महाविद्यालयाने यात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भागवत पौळ, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्रा डॉ एम एन कोलपुके, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री नटवे, प्राचार्य सिध्देश्वर पाटील, श्री अविनाश मुळदकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी , विविध भागातील स्पर्धेसाठी आलेल्या महाविद्यालयाचे संघाना व त्यांच्या सोबत आलेल्या प्राध्यापक यांना शुभेच्छा दिल्या, प्रत्येकाने जिंकण्यासाठीच खेळावे पण ज्यांना पारितोषिक मिळणार नाही अशांनी नाउमेद न होता परत पुढील स्पर्धेच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भागवत पौळ यांनी आपल्या भाषणात सांगितलं की,सदरील महाविद्यालयाने सन 2012 पासून सातत्याने महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन मंडळातर्फे होत असलेल्या अवेक्षणात उत्कृष्ट मानांकन प्राप्त केले, तसेच या महाविद्यालयाने आत्तापर्यंत दरवर्षी होत असलेल्या विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून पारितोषिके पटवविल्याचेही नमूद केले.दरम्यान महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य एम एन कोलपुके, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री नटवे व प्राचार्य सिध्देश्वर पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ चंद्रकांत ठाकरे यांनी प्रस्तावना केली व डॉ अमोल घोडके यांनी स्पर्धेचे नियम सांगितले .
विविध भागातून आलेल्या 29 महाविद्यालयाचे स्पर्धकांमधे प्रथम फेरी घेण्यात आली. प्रथम फेरीतून चांगले गुण संपादन केलेल्या पहिल्या 15 संघाची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली. व त्या फेरीतही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम पाच संघास अंतीम फेरीत प्रवेश मिळाला.पहिल्या पाच संघा मद्ये कोकण ज्ञानपीठ राहूल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्जत, चन्नबश्वेश्वर तंत्रनिकेतन डी फार्मसी लातूर, महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी लातूर , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे डी फार्मसी धाराशिव व दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी लातूर हे संघ आले. अंतीम फेरीत कोकण ज्ञानपीठ राहूल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्जत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला तर महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी निलंगा यांनी द्वितीय तसेच चन्नबश्वेश्वर तंत्रनिकेतन लातूर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.कोकण ज्ञानपीठ राहूल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्जत यातील स्पर्धक रिया पाटील व अंकीता विसे यांनी रुपये सात हजार रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक पटकविलेल्या महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी चे स्पर्धक शुभांगी हुगले व सहिस्ता गाडीवान यांना रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच चन्नबश्वेश्वर तंत्रनिकेतन लातूर येथील स्पर्धक केतकी बेजंमवार यांना तीन हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.या प्रतियोगितेचे बक्षिस वितरण महाविद्यालयाचे प्रा डॉ भागवत पौळ , डॉ संजय दुधमल, डॉ चंद्रकांत ठाकरे, डॉ अमोल घोडके, श्री विलास कारभारी, सौ. प्रा अरुणा पौळ, प्रा राजश्री मोरे , प्रा सलमा कादरी, सौ. मनिषा आवाळे, यांच्या हस्ते देण्यात आले.