विविध उपक्रमांनी साजरा होणार अरविंद पाटील यांचा वाढदिवस
कासारसिरसी येथील कुस्ती दंगल सर्वांचे आकर्षण

निलंगा : भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचा शनिवार (दि ९) मार्च रोजी होणारा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जाणार असून कासारसिरसी येथे होणारी भव्य कुस्त्यांची दंगल सर्वांचे आकर्षण ठरणार आहे.
अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंधेला दि ८ मार्च रोजी हासोरी येथे ज्ञानेश्वर बरमदे यांच्या पुढाकारातून हभप माऊली महाराज पठाडे यांचे किर्तन, दि ९ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजता ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदीरात अभिषेक, ८:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन, ८:४५ वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन, ९ वाजता हुतात्मा स्मारक येथे अभिवादन, ९:३० ला पिरपाशा दर्गा येथे चादर अर्पण, ९:४५ वाजता दादापीर दर्गा येथे चादर अर्पण, १० वाजता स्व डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन, १०:३० उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच अंबुलगा (बु) येथे दिवसभर भव्य मोफत आरोग्य शिबीर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तालुक्यातील आरोग्य केंद्रात फळवाटप व विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर संध्याकाळी ९ वाजता शिवाजी विद्यालयाच्या मैदानात आयोजित क्रिकेट सामन्यांचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. तसेच अप्पाराव सोळंके यांच्या पुढाकारातून सावनगीरा येथे दि ९ रोजी सकाळी हणुमान आराधना, १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता हभप संग्रामबापू भंडारे आळंदी व अरविंद पाटील निलंगेकर यांनी रथातून मिरवणूक, ७ वाजता भंडारे महाराज यांची किर्तनसेवा, तसेच यंदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे विशेष आकर्षण म्हणजे कासारसिरसी येथे उमेश उमापुरे युवा मंच्याच्या वतीने ‘भाऊ पाटील कुस्ती दंगल’ भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये उप महाराष्ट्र केसरी पै.सागर बिराजदार विरुध्द ईराण देशाचा अली पैलवान याची तीन लाख ३३ हजार ३३३ रु . मुख्य लढत होणार तसेच पै.शैलेश शेळके विरुध्द पै.योगेश पवार यांच्यासह अनेक मातब्बर पैलवानाच्या कुस्ती दंगल होणार आहेत. सर्वांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी अरविंद पाटील निलंगेकर सकाळी १० ते २ वाजेपर्यंत जनसेवा कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष तथा वाढदिवस संयोजन समितीचे कुमोद लोभे यांनी सांगितले.