• Wed. Apr 30th, 2025

‘माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांनी स्वतःकडेही पाहावं’; विजय वडेट्टीवारांच्या कन्येने टोचले भाजपचे कान!

Byjantaadmin

Mar 7, 2024

मी आणि माझे वडील विजय वडेट्टीवार दोघेही CONGRESS विचारधारेला बांधलेले आहोत. भाजपकडे चांगले नेते नाही, म्हणून ते विजय वडेट्टीवार किंवा इतर काँग्रेस नेते भाजपमध्ये येतील अशा अफवा पसरवत असतात, माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने स्वतःकडेही पाहावे, असा टोला शिवानी वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे. 

शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, चंद्रपूरमधून उमेदवारीसाठी माझ्यात आणि PARTIBHA DHANORKAR यांच्यात हेल्दी कॉम्पिटिशन सुरु आहे. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने स्वतःकडेही पाहावे. मुनगंटीवार मोठे नेते, चंद्रपुरात त्यांच्या विरोधात निवडणूक लढताना शिकायला मिळेल. विजय वडेट्टीवार आणि मी निष्ठावंत काँग्रेसी आहोत. अनेक वर्ष निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. माझ्या सारख्या निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. पक्ष जो निर्णय करेल त्याचे मी पालन करेल.

काँग्रेसपेक्षा घराणेशाहीचे जास्त उदाहरण भाजपमध्ये

बेरोजगार तरुण कंत्राटी कामगार, भूमिपुत्रांना रोजगार हे मुद्दे माझ्यासाठी महत्वाचे राहणार आहे. संपूर्णMAHARASHTRAत महिला दावेदार नाहीत. मात्र ही गर्वाची बाब आहे की CHANDRAPUR मध्ये मी आणि प्रतिभा धानोरकर अशा दोन महिला दावेदार आहेत. हे खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण आहे.  माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने स्वतःकडेही पाहावे. काँग्रेसपेक्षा घराणेशाहीचे जास्त उदाहरण भाजपमध्ये आहेत. भाजपने तरुणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून वंचित ठेवले आहे.

सुधीर मुनगंटीवार ग्राउंड लेव्हलवर काम करू शकत नाही

सुधीर मुनगंटीवार मोठे नेते आहेत. निवडणुकीच्या रणांगणात मुनगंटीवार विरोधात लढताना भरपूर काही शिकायला मिळेल. मात्र, सुधीर मुनगंटीवार एवढे मोठे झाले आहेत, की ते आता ग्राउंड लेव्हलवर काम करू शकत नाही. मात्र मी ग्राउंड लेव्हलवरच आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. 

मी आणि माझे वडील काँग्रेसच्या विचारधारेला बांधलेले 

विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप करतात. मी आणि माझे वडील विजय वडेट्टीवार दोघेही काँग्रेसच्या विचारधारेला बांधलेले आहोत. भाजपकडे चांगले नेते नाही, म्हणून ते विजय वडेट्टीवार किंवा इतर काँग्रेस नेते BJP मध्ये येतील अशा अफवा पसरवत असतात, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपावर केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *