मेट्रोबेन अबॅकस सहाव्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये रिध्दी गायकवाड राज्यात प्रथम
लातूर -दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेण्यात आलेल्या मेट्रोबेन अबॅकस सहाव्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन 2024 अॅडव्हांस लेवल परीक्षेमध्ये कु.रिध्दी राहुल गायकवाड ही विद्यार्थीनी राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल टॉपर ऑफ द टॉपर ट्रॉफी देऊन सिनेअभिनेत्री माधुरी पवार, अभिनेता ओम यादव यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्व्हेकर, लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, मेट्रोब्रेनचे अध्यक्ष संतोष लोहारे, दूर्गा अबॅकस क्लासेसच्या संचालिका भोसले मॅडम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मेट्रोब्रेनचे अध्यक्ष संतोष लोहारे म्हणाले की, रिध्द गायकवाड ही दूर्गा अकॅबस क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण घेणारी उत्कृष्ठ विद्यार्थीनी असून तिचे पुढील आयुष्य उज्ज्वल व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
