अरविंद पाटील-निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान
———————————————-
आंतराष्ट्रीय मल्लांच्या प्रेक्षणीय लढतीचे नियोजन
निलंगा:- तालुक्यातील कासार शिर्शी येथे शनिवार दि.९ मार्च रोजी भाजपा प्रदेश सचिव, युवा -हदयसम्राट श्री.अरविंद (भाऊ) पाटील-निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उमेश (भैय्या) उमापुरे युवा मंच्याच्या वतीने (भाऊ पाटील कुस्ती दंगल) भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले असुन, यामध्ये उप महाराष्ट्र केसरी पै.सागर बिराजदार विरुध्द ईराण देशाचा अली पैलवान याची तीन लाख ३३ हजार ३३३ रु . मुख्य लढत होणार असल्याचे माहीती उमेश भैय्या उमापुरे युवा मंचचे उमेश उमापुरे यांनी दिली.

या निकाली कुस्त्यांचे मैदान जि.प.प्रा.शाळेच्या खुल्या मैदानात होणार असुन प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असुन याचे उद्घाटन दु.२:०० वा अनेक मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याचे समजते.
सदर मैदानात पै.शैलेश शेळके विरुध्द पै.योगेश पवार यांच्यासह अनेक नामवंत मल्लांच्या निकाली कुस्त्या होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.सध्यस्थितीत मैदानाची नियोजनबद्ध आखणीसाठी उमेश उमापुरे,शिवत्रपती पुरस्कार विजेते पै ज्ञानेश्वर गोचडे,पै.लहु गोरे,पै.बळीराम बिराजदार,पै.गणेश जगदाळे, पै.युवराज जोगी यांचेसह आदी परिश्रम घेत आहेत.