• Tue. Apr 29th, 2025

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास बचत गटातील महिलांना 50 रुपये दंडाचा फतवा!

Byjantaadmin

Mar 4, 2024

जळगाव : शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हानिहाय पद्धतीने राज्य सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी होत असलेल्या अवाढव्य खर्चावरून विरोधकांवरून टीका होत आहे. ही टीका होत असतानाच जळगावमधीलकार्यक्रमामधून भलतीच बाब समोर आली आहे. 

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित न राहिल्यास 50 रुपये दंड

जळगावमध्ये (Jalgaon News) आज (4 मार्च) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी महिला बचत गटातील महिलांनी उपस्थिती न लावल्यास पन्नास रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महिला बचत गटांना यासाठी टार्गेट करण्यात आलं असून जर महिला बचत गटातील महिला शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित न राहिल्यास 50 रुपये दंड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासंदर्भातील मेसेज आणि उलट सुलट प्रतिक्रिया आता jalgaon मधील सोशल मीडिया ग्रुपमधून व्हायरल होत आहेत. 

गर्दी जमवण्यासाठी दंडाचा फतवा काढल्याने संताप

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी दंडाचा फतवा काढल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोणतेही कारण न देता या कार्यक्रमाला उपस्थित रहावेच असेही म्हटले आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी हा कुठला प्रकार? अशी विचारणा होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये शेतात असा, लग्नाला जावा किंवा आणि काहीही असो कुठलेही कारण ऐकलं जाणार नाही, पन्नास रुपये दंडही केला जाईल, असे म्हटले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed