• Mon. Apr 28th, 2025

मिनार उर्दू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेतून आपले आणि संस्थेचे नावलौकिक वाढवावे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

Byjantaadmin

Mar 2, 2024

मिनार उर्दू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेतून आपले आणि संस्थेचे नावलौकिक वाढवावे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर -जुबेदिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी लातूरद्वारा संचलित मिनार उर्दू स्कूल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून हाजी अब्दूल रज्जाक नाना अत्तरवाले हे करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सीबीसीएस शिक्षणपद्धती राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम केलेले आहे. या शिक्षणातून रिसर्च, उद्योजकता, योगासन, अध्यात्म व मातृभाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. या शिक्षणातून विद्यार्थी, स्वावलंबी व स्वयंपूर्ण होत आहे. त्यामुळे मिनार उर्दू स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही या शिक्षणातून, गुणवत्तेतून  आपले आणि संस्थेचे नावलौकिक वाढवावे असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले


यावेळी ते मिनार उर्दू माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हाजी अब्दुल रज्जाक नाना अत्तरवाले हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते जाफर पटेल, माध्यमिकचे मुख्याध्यापक इनाम शेख, उच्च माध्यमिकच्या प्राचार्य शेख अस्लम, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका आनिसा शेख, शेख हरीस, मुजीब पटेल, मोहजीब इनामदार, शेख जावेद, मसूद खान, अफसर शेख, मुजाहीद शेख, बाशीद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, 18 व्या शतकामध्ये शिकागो येथील परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून मत मांडण्याचा योग आला तेव्हा त्यांनी भारताची संस्कृती कशी आहे याबाबत मत व्यक्‍त करून आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले. तेव्हा त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरून 21 व्या शतकामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्ता बनून जगाचे नेतृत्व करेल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.

 बुध्दिच्या जोरावर जगावर राज्य करण्याचा योग येईल!
जगामध्ये सर्वाधिक तरूण व सर्वात हुशार तरूण भारतातच आहेत परंतु इंग्रजकालिन शिक्षण पध्दतीमुळे कारकूर पदवीधर तयार झाले. यामध्ये तरूणाचा दोष नसून या देशातील राज्यकर्ते लोकांच्या धोरणाचा परिणाम आहे. परंतु सध्या मात्र बुद्धिच्या जोरावर जगावर राज्य करणार्‍यामध्ये बिल गेट्स, राममूर्ती यांचा समावेश आहे. तसेच देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम हेही बौद्धिक संपदेच्या जोरावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. शिक्षणामध्ये मोठी ताकत आहे. त्यामुळे  बुध्दिच्या जोरावर भारतीय तरूणांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगावर राज्य करण्याचा योग येईल असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
——————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed